अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ मार्च ते ३० मार्च)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, केतू, लाभात बुध, शुक्र, नेपचून आणि व्ययात रवी अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. प्रेमिकांसाठी हा काळ विशेष सुंदर आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्य विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोचारतज्ञ यांना चांगला आहे. मात्र कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात कुचराई करु नका. कुलस्वामिनीचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, व्दितिय स्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शनी, केतू व प्लुटो, दशमात बुध, शुक्र, नेपचून, लाभात रवी आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगली. तब्येत सांभाळावी. गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. सप्ताह मध्यात पती/ पत्नीला भाग्योदयाच्या संधी अपेक्षित आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. जोखिम असलेले काम करु नका. सप्ताहाच्या शेवटी काहींना भाग्यवर्धक घटना थक्क करतील. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींच्या बाबतीत गुरुकृपा शक्य आहे. मारुतीची उपासना या कालावधीत जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शनी, केतू, प्लुटो, भाग्यात बुध, शुक्र, नेपचून, दशमात रवी, लाभस्थानी हर्षल आणि व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. काहींना एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. कलाकारांना विशेषत: गायकांना छान कालावधी आहे. सप्ताह मध्यात अ‍ॅसिडीटी/ पोटाच्या काही तक्रारी काहींना जाणवतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर पती/ पत्नीशी वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. तब्येत नरमगरम राहू शकते काळजी घ्यावी. या काळात काही दुखापती होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मारुतीची उपासना या कालावधीत जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात गुरु, षष्ठात शनी केतू, व प्लुटो, अष्टमात बुध, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात रवी, दशमात हर्षल, लाभात मंगळ, आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे. संततीकडून छान बातमी कळेल. घरात उत्सवाचं, आनंदाचं वातावरण असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. वकिलांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी घरातील लोकांशी वाद टाळावेत. गणपतीची उपासना लाभदायक ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शनी, केतू, प्लुटो, सप्तमात बुध, शुक्र, नेपचून, अष्टमात रवी, भाग्यात हर्षल, दशमात मंगळ आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडांबद्द्ल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यात सप्ताह मध्यात घरगुती प्रश्न सोडवण्याकडे कल असेल. भरपूर काम करावे लागल्याने आराम मिळणार नाही. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. खेळाडूंनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे. कुठलिही गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करावेत. तज्ञांचा सल्ला जरुर घ्या. गणपतीची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनी, केतू, प्लुटो, षष्ठात बुध,  शुक्र, नेपचून, सप्तमात रवी, अष्टमात हर्षल, भाग्यात मंगळ, आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. चैनीकडे कल असेल. काहींना धनलाभ होऊ शकतील. फ़क्त या काळात आपल्या बो\लण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्य प्रवासाचे योग आणू शकतो. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते यांच्यासाठी चांगला कालावधी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे होतील. प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. मारुतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शनी, केतू, प्लुटो, पंचमात बुध,  शुक्र, नेपचून, षष्टात रवी, सप्तमात हर्षल, अष्टमात मंगळ, आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
रविवार मस्त जांणार आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. नंतरचे दोन दिवस खाण्या-पिण्यावर तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले गेल्यास त्याचे दूरगामी परीणाम होण्याची शक्यता आहे. वाहने जपून चालवा. जोखिम असलेल्या कोणत्याही गोष्टी सध्या नको. सप्ताह मध्यानंतर भावंडांच्या भेटीचे योग येतील. आनंददायी व फ़ायदेशीर प्रवासयोग आहेत. धनलाभ होती. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीची कामे नकोत. कुलस्वामिनीची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात बुध,  शुक्र, नेपचून, पंचमात रवी, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमात मंगळ आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीस काही आर्थिक चिंता असतील. अचानक एखादा खर्च करावा लागेल. सोमवार व मंगळवार जोडीदाराशी वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्या. सप्ताह मध्यात परीस्थितीत सुधारणा होईल. प्रियजनांच्या भेटी होतील. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल. काहींना धनलाभाचे योग येतील. कवी, लेखक यांच्यासाठी हा सप्ताह मस्त जाईल. मनासारखं काव्य/ लेखन घडेल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीच्या कामात सावधानता बाळगा. सप्ताहाच्या शेवटी प्रवासाचे योग संभवतात. गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात बुध, शुक्र, नेपचून, चतुर्थात रवी, पंचमस्थानात हर्षल, षष्ठात मंगळ, सप्तमस्थानी राहू आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
रविवारचा दिवस छान जाईल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. सोमवार, मंगळवार संमिश्र घटनांचे आहेत. काही मनाविरुध्द घटना शक्य आहेत. आपल्या तब्येतीलाही जपावे. सप्ताह मध्य अध्यात्म मार्गातील लोकांसाठी चांगला आहे. सप्ताह अखेर मन प्रसन्न असेल. मौज मजेकडे कल असेल. प्रियजनांच्या भेटी होतील. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. देवी उपासना जरूर करावी चांगले अनुभव येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, शुक्र, नेपचून, तृतियस्थानात रवी, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात राहू, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. मात्र अती आत्मविश्वास नको. शेअर मार्केटसारख्या व्यवहारांपासून सध्या लांबच रहावे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका.
परदेशगमनासाठी प्रयत्न जर करत असाल तर आता अनुकूल काळ आहे. कुलस्वामिनीची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, नेपचून, धनस्थानात रवी, तृतियस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात राहू, दशमस्थानी गुरु  लाभस्थानी शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. त्यामुळेव खुशीत असाल. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ संभवतो. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग येतील. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सूर सप्ताह अखेरीपर्यंत टिकणार आहे. कुलस्वामिनीची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, धनस्थानात हर्षल, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी बुध, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होईल २७ तारखेला शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल आणि २९ तारखेला गुरु धनु राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील.  बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकुल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. गुरू उपासना फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध