अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ फेब्रुवारी ते २ मार्च)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शुक्र, शनी व प्लुटो, दशमात केतू आणि लाभात रवी, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. सप्ताह मध्यात वाहने जपून चालवावीत. कुठलीही जोखिम सध्या नको. उष्णतेचे त्रास संभवतात. वाद टाळावेत. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात कुचराई करु नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शुक्र, शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात रवी, बुध, नेपचून आणि व्ययस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगली आहे. आपली तब्येत मात्र सांभाळावी तसेच गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. सप्ताह मध्यात सप्ताह मध्यात पती/ पत्नीला वेळ द्या. आपापसात काही वाद असतील तर लवकरात लवकर कसे मिटतील ते बघा. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य. प्रवासात काळजी घ्या. मारुतीची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शुक्र, शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात रवी, बुध, नेपचून आणि लाभस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. प्रेमिकांसाठी आनंददायी काळ आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना अतिशय छान ग्रहमान आहे. काहींना एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावेल. नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. अ‍ॅसिडिटी/ पोटाचा ज्यांना त्रास असेल त्यांनी आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी व्यवहार पारदर्शक ठेवावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, षष्ठात शुक्र, शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात रवी, बुध, नेपचून आणि दशमात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला घरात प्रसन्न वातावरण असेल. छान खरेदीचे योग येऊ शकतात. आवडत्या माणसांचा सहवास लाभेल. मौज मजा करण्याकडे कल असेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्या०नंतर तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकिय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शुक्र, शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात रवी, बुध, नेपचून, भाग्यात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांबद्द्ल चांगली बातमी कळेल. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. कवी व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. सप्ताह मध्यात घरगुती प्रश्न सोडवण्याकडे कल असेल. भरपूर काम करावे लागल्याने आराम मिळणार नाही. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. खेळाडूंनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शुक्र, शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात रवी, बुध, नेपचून, अष्टमात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. काहींना धनलाभ होऊ शकतील. घरातील वातावरण आनंदी असेल. सप्ताह मध्य प्रवासाचे योग आणू शकतो. वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम पाळा. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर आपल्या लिहिण्यामुळे वाद होणार नाहीत याची पुरेशी काळजी घ्या. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी. काहींना नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी येईल. आपल्या छंदांना जरुर वेळ द्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शुक्र, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात रवी, बुध, नेपचून, सप्तमात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मन आनंदी असेल. मौजमजेचे प्रसंग घडतील. एखाद्या खाऊगल्लीला जरूर भेट द्या. आपल्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम झाल्याने खुश असाल. कलाकारांना, वक्त्यांना सप्ताह चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या छंदांना जरूर वेळ द्या. प्रवासासाठीही अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, तृतियस्थानात केतू, चतुर्थात रवी, बुध, नेपचून, आणि षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक एखादा खर्च करावा लागेल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. सप्ताहाच्या मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही आजार असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभाचे योग येतील. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, धनस्थानी केतू, तृतियस्थानात रवी, बुध, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानी राहू आणि व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काही लाभाचे प्रसंग शक्य आहेत. आवडत्या पदार्थांच्या मेजवानीचा योग येईल.  सप्ताह मध्यात खरेदीचे योग आहेत. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभाचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी रवी, बुध, नेपचून, चतुर्थस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शुक्र, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात जुन्या मित्रांची किंवा आप्तेष्ठांची भेट सुखावून टाकेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, नेपचून, तृतियस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शुक्र, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. ऑफ़िसच्या कामासाठी प्रवासयोग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, लाभस्थानी केतू आणि व्ययस्थानी रवी, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल. २५ तारखेला बुध मीन राशित प्रवेश करेल. २८ तारखेला रविचा मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताहाचा शेवटी मित्रांच्या भेटीचे योग येतील
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group