अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ जानेवारी ते १९ जानेवारी)

मेष रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाची सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, शुक्र, भाग्यात रवि, बुध, शनी व प्लुटो, दशमात केतू, लाभात नेपचून व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

या सप्ताहात आपल्याला ग्रहमान थोडेसे प्रतिकुल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुध्द खर्च करावे लागतील. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रवासात अडथळे संभवतात. ज्यांना डोकेदुखी/ मायग्रेन असे त्रास असतील त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यायची आहे. सप्ताहाच्या मध्यात आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग आहेत.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, शुक्र, अष्टमात रवि, बुध, शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात नेपचून, लाभात मंगळ आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. जोडीदाराबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी कळतील. भागीदारीबद्दलचे काही प्रस्ताव आले आणि जर ते आपल्याला अनुकुल असतील तर ते स्विकारायला हरकत नाहीत. मात्र या काळात आपल्या बोलण्यावर संयम ठेवणे गरजेचे आहे. आपल्या मुलांशी वाद टाळा. सप्ताहाच्या मध्यात पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतुन लाभ होऊ शकतील. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. सप्ताहाची अखेर मनाविरुध्द घटनांची असु शकेल.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, शुक्र, सप्तमात रवि, बुध, शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात नेपचून, दशमात मंगळ आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराशी वाद टाळावे. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, शुक्र, षष्ठात रवि, बुध, शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. सप्ताह मध्यात छान काम होईल. तुमच्यावर वरीष्ठ खुष असतील. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. कलाकारांसाठी व प्रेमी जीवांसाठी हा कालावधी खुप चांगला आहे. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे. तब्बेतीची मात्र काळाजी घेणे इष्ट.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, शुक्र, पंचमात रवि, बुध, शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात मंगळ, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताहाची सुरुवात शारीरिक त्रासाची व कंटाळवाणी होईल. कामाच्या ठिकाणी आपली चुक होणार नाही याची काळजी घ्यावी. घरातील मंडळींशी वाद टाळा. अध्यात्म मार्गातील लोकांना मात्र ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य. व्यावसायिक लोक मनासारखे काम झाल्याने खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी काही कामं किंवा काही लाभ होता होता राहू शकतात. मित्रांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करणे चांगले.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, शुक्र, चतुर्थात रवि, बुध, शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात नेपचून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला. एखाद्या मेजवानीचा/ समारंभाचा भाग व्हाल. खाण्यापिण्यावर मात्र नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतात. मात्र कागदपत्रं व्यवस्थित आहेत ना याची खातरजमा करुन घ्यावी. वाहने हळू चालवावीत. सप्ताह मध्यानंतर इंशुरन्स व वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत कार्य करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. काहींना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकुल आहे.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शुक्र, तृतियस्थानात रवि, बुध, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. मात्र तब्बेतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी प्रतिकुल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. काहींना प्रवासयोग येऊ शकतात.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र धनस्थानी रवि, बुध, शनी, प्लुटो, तृतियस्थानात केतू, चतुर्थात नेपचून, पंचमस्थानात मंगळ आणि षष्ठस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य सप्ताहाच्या सुरूवातीला छान लाभ होतील. मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास जाणवतील. खाण्या- पिण्याबाबत अतिरेक टाळावा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, शनी, प्लुटो, धनस्थानी केतू, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी गुरु, शुक्र  अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताहाच्या सुरुवातीला एक प्रकारचं दडपण विनाकारण मनावर राहील. घरकामासाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांना प्रतिकुल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकुल आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतुन फ़ायदा संभवतो. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरात एखादा उत्सव, समारंभ किंवा छान पार्टी करायला हरकत नाही.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू,  आणि लाभस्थानी गुरु, शुक्र व्ययस्थानी रवि, बुध, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी चांगला काळ आहे. लाभदायक प्रवासयोग येतील. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला नाही. आपल्या चीजवस्तु सांभाळाव्या. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. नोकरी बदलासाठीही अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करतांना सावधानता बाळगावी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, शुक्र, लाभस्थानी रवि, बुध, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासाचे योग येतील मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. छान खरेदीचे योग येऊ शकतात. विद्यार्थांना चांगला कालावधी. कलाकारांना अनुकुल काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा. काहींना छान धनलाभ होतील.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, शुक्र, दशमस्थानी रवि, बुध, शनी, प्लुटो, लाभस्थानी केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला बुधाची शनीशी युती होईल. १४ तारखेला रवि मकर राशित प्रवेश करेल व बुधचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाची प्लुटोशी युती होईल व शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल.

संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासयोग येतील. मात्र कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मौज मजेचे प्रसंग घडतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. दर्जेदार लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकुल काळ आहे.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य#ज्योतिषशास्त्र#अ‍ॅस्ट्रोशोध