मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, हर्षल, धनस्थानी शुक्र, चतुर्थात राहू,  सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू, लाभात नेपचून आणि व्ययस्थानी बुध  अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध लग्नस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
पूर्ण सप्ताह भाग्यकारक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ शाबासकीची एखादी थाप
मिळू शकते. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह अखेरीस मनासारखी खरेदी कराल. जोडीदाराला एखादं छानसं प्रेझेंट देऊन खूश करु शकाल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, तृतियेत राहू, षष्ठात गुरु, अष्टमात शनी, व प्लुटो, भाग्यात मंगळ, केतू, दशमात नेपचून, लाभात बुध आणि व्ययस्थानी रवि, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल.  ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध व्ययस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.                                                                                                  सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ चकित करती. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. ज्योतिष, अध्यात्म अशा गूढ गोष्टींकडे ऒढा राहील. काहींना प्रवासयोग येतील परदेशगमनासाठी प्रयत्नात असाल तर त्यासाठी अनुकूल कालावधी आहे. मात्र प्रवासात अडथळे येऊ शकतील. सप्ताह मध्यात कामात कुचराई करु नका. यशाचं प्रमाण कमी झाल्याने नाराज होऊ नका. सप्ताह अखेरीस एखदा मित्र किंवा नातेवाईक यांचा विरोध सहन करावा लागू शकतो. तब्बेतीची काळजी
घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात गुरु, सप्तमात
शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून, दशमात बुध, लाभस्थानी रवि, हर्षल आणि
व्ययस्थानी शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध लाभस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. विवाहोत्सुक लोकांसाठी विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे.
भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. प्रवासयोग संभवतात.  सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम व त्याची झाल्याने खुश असाल. नविन विषयांचा अभ्यास सुरु करायला अनुकूल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी
व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून भाग्यात बुध, दशमात रवि, हर्षल आणि लाभात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल.  ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध दशमस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.                                                                                               सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. इंशूरन्स एजंट, सर्जन यांना हा काळ चांगला आहे. पोटासंबंधी काही त्रास असेल तर हे २/३ दिवस जपावे. सप्ताहाच्या शेवटी नोकरदार मंडळींना अनुकूल काळ आहे. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही अनुकूल ग्रहस्थिती आहे. वास्तू खरेदीविक्री करणार्‍यांसाठी अनुकुल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात बुध,  भाग्यात रवि, हर्षल दशमस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानी राहू,  अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध भाग्यस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना व वकिलांना हा काळ चांगला आहे. कूठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. प्रेमी जीवांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. ज्योतिषाचा, मानसशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, सप्तमात बुध, अष्टमात रवि, हर्षल, भाग्यात शुक्र  आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध अष्टमस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. भेळ/ पाणीपूरी असे चटकमटक पदार्थ या सप्ताहात
टाळलेलेच बरे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. घरातील
वातावरण आनंदी असेल. काहींना धनलाभ शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, षष्टात बुध, सप्तमात रवि, हर्षल, अष्टमात शुक्र,  आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध सप्तमस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. आप्तेष्ट/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकुल काळ आहे.  सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल आहे. सप्तहाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकिल यांना हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू,  चतुर्थात नेपचून पंचमात बुध, आणि षष्ठस्थानात रवि, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी राहू व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध षष्टस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना काळ अनुकुल नाही. अति आत्मविश्वास टाळावा. शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारात फ़टका बसण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून चतुर्थात बुध, पंचमस्थानात रवि, हर्षल, षष्टस्थानात शुक्र,  अष्टमस्थानी राहू आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध पंचमस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे योग संभवतात. छान मेजवानीचे योग येतील. काहींना प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या सुरुवातीचा लागलेला
चांगला सूर शेवटपर्यंत टिकणार आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात बुध, चतुर्थस्थानी रवि, हर्षल, पंचमात शुक्र, सप्तमस्थानी राहू,  दशम स्थानी गुरु, आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध चतुर्थस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला जरी काही अडथळे आले किंवा गोष्टी मनाविरुध्द झाल्या तरी नंतर सप्ताह चांगला आहे. डोळ्यांची या सप्ताहात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांनी भरलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठी हा कालावधी चांगला आहे. काहींना तिर्थक्षेत्रांना भेट देण्याचे योग संभवतात. मात्र काही खर्च मनाविरुध्द करावे लागू शकतील. सप्ताह अखेर लेखक/ कलाकार/ कवी यांना चांगला आहे. नोकरी/ व्यवसायात छान काम होईल. काहींना कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग संभावतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी बुध, तृतिय स्थानात रवि, हर्षल, चतुर्थात शुक्र,  षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल.  ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध तृतियस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. आपल्या जिवलगांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी. काहींना प्रदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्य भाग्यवर्धक असेल. केलेल्या कामात यशाचं मान जास्त असेल. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटी शक्य. सप्ताह अखेरीस घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा मित्रमंडळीं/आवडत्या लोकांबरोबर मस्त मेजवानीचा बेत ठेवायला हरकत नाही. घरात आनंदी वातावरण असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, धनस्थानात रवि,  हर्षल, तृतिय्स्थानी शुक्र,  पंचमस्थानी राहू,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  ७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला बुध धनस्थानात प्रवेश करेल आणि रविचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात.
काही लाभ होण्याची शक्यता आहे. ऒळखीच्या व्यक्तीकडून एखादं अडलेलं काम होऊ शकेल.
तब्बेतीकडे मात्र लक्ष द्यावे. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्‍यांना
चांगला काळ आहे. काहींना प्रदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस उगीचच कुठल्यातरी गोष्टीची हुरहुर जाणवत राहील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#weekly#horoscope#astroshodh