अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१ एप्रिल ते ७ एप्रिल)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल,
चतुर्थात राहू, सप्तमात गुरु, भाग्यात मंगळ, शनी व प्लुटो, दशमात
केतू , लाभात नेपचून आणि व्ययस्थानी रवि, बुध, अशी ग्रहस्थिती
असेल.
सप्ताहाची सुरूवातीलानविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली
संधी मिळू शकते. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल
चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही
आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्बेतीची काळजी
घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. आपली
धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात गुरु, अष्टमात मंगळ, शनी, व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात नेपचून, लाभात रवि, बुध, आणि व्ययस्थानी शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना छान कालावधी आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात गुरु, सप्तमात मंगळ, शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात नेपचून, दशमात रवि, बुध आणि लाभस्थानी शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरगुती प्रश्नांकडे घरासंबंधी एखादी दुरुस्ती किंवा सुधारणा करावी लागण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात मंगळ, शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात नेपचून भाग्यात रवि, बुध आणि दशमात शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात काही सुखद/ आंनंददायक प्रसंग घडू शकतात. प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीची कामे करणार्‍यांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु, पंचमात मंगळ, शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात रवि, बुध, भाग्यात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाची सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग येतील. कुटुंबात वादाचे प्रसंग टाळावेत. आपल्या बोलण्याने कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. लेखक, वक्ते, कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. एखादा अचानक धनलाभही होऊ शकतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, चतुर्थात मंगळ, शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात नेपचून, सप्तमात रवि, बुध, अष्टमात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाची सुरूवातीला मनाविरुध्द घटना संभवतात. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताह मध्य कलाकारांना, वक्त्यांना चांगला आहे. आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. प्रवासात पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येऊ शकतात. घरासंबंधी एखादी दुरुस्ती किंवा सुधारणा करावी लागण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत मंगळ, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात नेपचून, षष्टात रवि, बुध, सप्तमात शुक्र, हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा अनपेक्षित खर्च करावा लागू शकतो. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत घलवण्याकडे कल असेल. सप्ताह मध्यात मनावर व बोलण्यावर संयम ठेवावा. आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर शक्य असल्यास प्रवास टाळावेत. प्रवास आवश्यकच असतील तर प्रवासात आपल्या चीजवस्तू सांभळाव्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, तृतियेत केतू, चतुर्थात नेपचून पंचमात रवि, बुध, आणि षष्ठस्थानात शुक्र, हर्षल भाग्यस्थानी राहू, व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. कामानिमित्त प्रवास शक्य. मनासारखी चांगली खरेदी कराल. मात्र अति दगदग टाळावी. सप्ताह मध्यात हातातलं काम लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. सप्ताह अखेरीस आपल्या रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, धनस्थानी केतू, तृतिय स्थानात नेपचून चतुर्थात रवि, बुध, पंचमस्थानात शुक्र, हर्षल अष्टमस्थानी राहू आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाच्या सुरुवातीस आपल्या कार्यक्षेत्रात जास्त काम करावं लागू शकेल. मनाविरुध्द घटना शक्य. सप्ताह मध्यानंतर मात्र परीस्थितीत सुधारणा होईल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. कुणाच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे मनाचा तोल जाऊ देऊ नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात रवि, बुध, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, सप्तमस्थानी राहू, दशम स्थानी गुरु, आणि व्ययस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाच्या सुरुवातीस बेकायदा काहीही करु नये. वाहने चालवतांना गाडीची कागदपत्रे, लायसन्स जवळ बाळगावे. शक्यतो कायद्याच्या कचाट्यात आपण सापडणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात छान काम झाल्याने वरीष्ठांकडून कौतूकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ चांगला आहे. काहींना धनलाभ संभवतात. सप्ताह अखेरीस मित्रांशी किंवा आप्तेष्टांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी रवि, बुध, तृतिय स्थानात शुक्र, हर्षल, षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी मंगळ, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर त्यात सुधारणा होत जाईल. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द घटना संभवतात. काही लाभ होता होता राहून जातील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, धनस्थानात शुक्र, हर्षल, पंचमस्थानी राहू, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, लाभ स्थानी केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात विरोधी परीस्थितीचा सामना करावा लागेल. ईंन्शूरन्ससंबंधी कामे करणार्‍यांना तसेच लेखक व कवी यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात तब्बेतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. सप्ताह मध्यानंतर ठरविलेल्या धार्मिक गोष्टींमध्ये अडचणी येण्याची शक्याता आहे. सप्ताहाचा शेवट मनाविरुध्द घटनांचा आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group