अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२०)  Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, धनस्थानात राहू, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात गुरु, शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या लोकांशी संपर्क होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह मध्यात काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना चांगल्या संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवट संमिश्र घटनांचा असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मात्र डोके व डोळ्याच्या काही तक्रारी जाणवतील. ज्यांना मायग्रेन सारखे आजार आहेत त्यांनी काळजी घ्यावी.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, षष्ठस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. प्रवासयोग येतील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकांमुळे काही लाभदायक घटना घडू शकतील. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तु संशोधक यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर अचानक खर्चाची ठरु शकेल तसेच आरोग्यासंबंधी काही त्रास जाणवू शकतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखिम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वडील किंवा वडीलधारी व्यक्तीशी वाद संभवतात.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात आपलं काम बरं आणि आपण बरे हे धोरण ठेवा. गूढ गोष्टींकडे मनाचा कल असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात सूर्य, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात विचित्र घटनांनी होऊ शकेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावा. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी जोडीदाराबरोबर वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. मात्र आपलीच मते बरोबर असा हट्ट सध्या करु नका. तब्येतीची काळजी घ्या. मधुमेहाचा त्रास असणार्‍यांनी या काळात जरा जास्तच जपायला हवे आहे.  सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका. वरीष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.
उपासना: हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी बुध, शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात विचित्र घटनांनी होऊ शकेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावा. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी जोडीदाराबरोबर वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना संभवतील. जोखिम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणीव होईल. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना मात्र चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी काही लाभदायक घटना शक्य आहेत.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात बुध, शुक्र, तृतियस्थानी सूर्य, केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात गुरु, शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर निय़ंत्रण ठेवणे उचित ठरेल. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. शत्रूंच्या कारवाया वाढतील. वकील/ फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. लग्न ठरविण्यास ग्रहस्थिती अनुकूल आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, धनस्थानात सूर्य, केतू, तृतियस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मधूमेह किंवा पोटाचे आजार असणार्‍यांनी मात्र काळाजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारादाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकूल कालावधी आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, केतू, धनस्थानात प्लूटो, तृतियस्थानी गुरु, शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या छंदाला जरुर वेळ द्या. ग्रहमानाची साथ चांगली आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला आहे. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट तब्येतीसाठी चांगला नाही. मात्र वकील, जीम ट्रेनर व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात गुरु, शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, षष्ठस्थानात राहू, लाभस्थानात बुध, शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न असेल. घरात एखादा छानसा कार्यक्रम/ समारंभ साजरा कराल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची कामे करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ, एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने सुखावल्यासारखे होऊ शकेल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, दशमस्थानात बुध, शुक्र, लाभस्थानात सूर्य, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. मात्र खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा असं ग्रहांचं सांगणं आहे. आपल्या चीजवस्तू सांभाळा. डोळ्यांवर अती ताण येणार नाही असे बघा. सप्ताह मध्यात ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना चांगले ग्रह्मान आहे. छान खरेदीचे योग आहेत. मात्र या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी प्रतिकूल कालावधी आहे. बेकायदेशीर व्यवहारामध्ये पडू नका.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)सप्ताह मध्य

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, भाग्यस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात सूर्य, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. खरेदीसाठी चांगला काळ आहे काही अनावश्यक खर्चही या काळात करावा लागू शकेल. एखाद्या गोष्टीची काळजी/ चिंता वाटत राहू शकेल. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. डोळ्यांवर ताण पडू देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, अष्टमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात गुरु, शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग, चंद्राचा शुक्राबरोबर त्रिकोणयोग व बुधाचा मंगळाशी षडाष्टक होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर त्रिकोणयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची मंगळाबरोबर युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी, शनिशी व प्लूटोशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २८ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छानशी खरेदी कराल. एखादा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. मात्र आता केलेला खर्च किंवा देऊ केलेला वेळ भविष्यात नक्की फ़ायदा देऊ शकेल. आयात-निर्यात करणार्‍यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यामधे आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ आपल्यावर खुश असतील. धार्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. मन प्रसन्न असेल. मात्र दातांसंबंधी किंवा डोळ्यांसंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्या.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)