अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२०)  (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी, हर्शल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध (वक्री), अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काही खर्चही अचानक उद्भवू शकतात. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळाजी घ्यावी. डोळयांशी संबंधीत काही त्रास संभवतो. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. ब्लॉगर्स, वक्ते यांना हा काळ चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस पटकन कामे उरकुन आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध (वक्री), सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री) आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून लाभ होऊ शकेल किंवा अडकलेले पैसे अचानक मिळण्याची शक्यता आहे. गायक, वक्ते, आहारतज्ञ व फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात आरोग्यासंबधी काही समस्या जाणवतील. डोळ्यांची विशेष काळजी घ्या. या काळात बोलण्यावर संयम हवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चालढकल या काळात करु नये. यश मिळण्यासाठी कष्टाला पर्याय नाही याची जाणिव होईल.
सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संवाद साधाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध (वक्री), षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. केलेल्या कामाचे चीज होइल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांबरोबर भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या मदतीने अडकलेले एखादे काम मार्गी लागू शकेल. सप्ताहाचा मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. मनासारखी खरेदी होईल. आत्मविश्वास वाढलेला असेल. नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध (वक्री), पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काही धनलाभ होतील. भावंडांशी संवाद साधाल. लेखन, प्रिंटींग, पब्लिशिंग इ. कामात यश संभवते. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. ध्यानधरणा, मेडीटेशन किंवा पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या गोष्टी घडतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध (वक्री), चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. काही धनलाभ शक्य आहेत. कुटुंबीयांबरोबर छान वेळ व्यतित करु शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या समारंभात किंवा पार्टीत सहभागी व्हाल. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध (वक्री), तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारी वाहने जपून चालवावीत. लेखक/ ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. नंतरचे दोन दिवस उपासना करण्याऱ्यांना चांगला आहे. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध (वक्री), धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), सप्तमस्थानात हर्शल, अष्टमस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्या आणि जोडीदाराबरोबर वाद टाळा. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांच्यासाठी मात्र हा काळ अनुकूल घटनांना ठरणार आहे. गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास शक्य आहे.  सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कालावधी चांगला आहे. घरात छान पार्टीचे वातावरण असेल. जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही संभवतात. सप्ताह मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नये. काहींना सूचक स्वप्न पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), पंचमस्थानात हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध (वक्री) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांसाठी, घरासाठी किंवा गृहसजावटीसाठी खरेदी कराल. उपासनेसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करायचा असेल तर हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल घटनांचा असू शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध (वक्री), लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. घरागुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर वैद्यकीय व्यवसायातील लोक, केमिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. कोर्टकचेरीमधील कामांसाठीही अनुकूल काळ आहे. या काळात तब्येतीला जपा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ (वक्री), तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध(वक्री), दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि, अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. सप्ताहाच्या मध्यात घरात वाद होणार नाहीत या\ची काळजी घ्या. सप्ताह मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. कलाकार, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. विवाहोच्छूक व्यकींना विवाह ठरविण्यासही अनुकूल ग्रहमान आहे. नविन गुंतवणुक फ़ायदेशीर ठरेल. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जास्त दगदग किंवा श्रम टाळा.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ (वक्री), धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध(वक्री), भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग व बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व नेपचूनशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा हर्शलशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग तर बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. प्रवासात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ नये याचीही काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी मात्र प्रतिकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)