अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२०) (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

सर्वांना विजयादशमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी, हर्शल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध (वक्री), अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. जुने मित्र भेटतील. धनलाभ होईल. सप्ताह मध्यात मस्त खरेदी कराल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपुन चालवा. जोखिम असलेले काम टाळा. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध (वक्री), सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री) आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्य संमिश्र असेल. काही लाभ होतील मात्र काही लाभ होता होता राहून जातील. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. अडकलेले पैसे अनपेक्षितपणे मिळण्याची शक्यता आहे. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांनाही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध (वक्री), षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची होऊ शकेल. प्रवासयोग संभवतात. मात्र प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणे इष्ट राहील. वाहने जपून चालवा. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना हा कालावधी विशेष चांगला असेल. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा ठरु शकेल. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरी बदलासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आपल्या आरोग्याच्या काही समस्या या काळात जाणवतील. ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही आजार असतील तर या काळात जास्त काळजी घ्यावी. अती तिखट किंवा मसालेदार पदार्थ शक्यतो या काळात टाळावेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध (वक्री), पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. जोडीदाराची तब्येत सांभाळावी तसेच जोडीदाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. जोडीदाराला गृहित धरु नका. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असेल. काही भाग्यवर्धक घटना घडतील. मात्र स्वत:च्या तब्येतीला जपावे असे ग्रहमान सांगत आहे. विशेषत: मधूमेह किंवा यकृताची काही दुखणी असतील तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ
तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामांसाठी प्रवासयोग शक्य आहेत.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध (वक्री), चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या व जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही तक्रारी जाणवू शकतील. पाय/ पाठ/ गॅसेस/ संधीवाताचा त्रास असेल तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यात ज्योतिषी/ इतिहासकार/ सर्जन/ मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना काळ चांगला आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी वेळ काढावा लागेल. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय यश मिळणार नाही. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग संभवतात. वाहने जपून चालवा. शक्य असल्यास काही दिवसांसाठी प्रवास पुढे ढकला.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध (वक्री), तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंत दिवस चांगला जाणार आहे. त्यानंतरचे २ दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र हा काळ नोकरीबदलासाठी चांगला आहे. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. वकीलांना हा काळ अनुकूल आहे. फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे.
सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. वाहने जपून चालवावीत. जोडीदाराशी वाद टाळावेत. इंशूरन्सचे काम करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध (वक्री), धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), सप्तमस्थानात हर्शल, अष्टमस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंत घरात छान वातावरण असेल. नंतरचे २ दिवस विद्यार्थ्यांना, कलाकारांना व खेळाडूंना खुप चांगले आहेत. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल काळ आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी आणि भावंडांशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावेत. आरोग्याच्या काही समस्या घरात जाणवत रहातील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
आठवडा छान असणार आहे. आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. लेखक/ ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील मात्र प्रॉपर्टीची कागदपत्रे तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावीत. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. कमी श्रमात जास्त यश संभवते. आपल्या छंदालाही जरुर वेळ द्या. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. डोकेदुखी, मायग्रेन/ अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही व्याधी असतील तर काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), पंचमस्थानात हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध (वक्री) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग आहेत. लेखक, कवी, साहित्यिक यांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. एखाद्या समारंभात भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांना अनुकूल ग्रहमान आहे.
घराच्या/ घरातील वस्तुंच्या सुशोभिकरणासाठी/ दुरुस्तीसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांना मात्र ग्रहमान तितकेसे अनुकूल नाही.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध (वक्री), लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना धनलाभाची शक्यता आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात रहायला मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांशी/ शेजार्‍यांशी वाद टाळा. प्रवास शक्यतो या काळात टाळलेले बरे. परदेशाशी संबंधित काही काम असेल तर त्यासाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे. मित्रांच्या भेटी आनंद देतील. गृहसजावटीसाठी वेळ काढाल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ (वक्री), तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध(वक्री), दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि, अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खरेदीसाठी चांगला काळ आहे. एखादा अनावश्यक खर्चही करावा लागु शकतो. कुठल्यातरी गोष्टींची हुरहुर किंवा चिंता विनाकारण वाटत राहील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधित व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य लाभदायक असेल. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मौज मजा करण्याकडे कल असेल. जुने मित्र भेटतील. ऒळखीमुळे काही अडकलेली कामे सहजगत्या होतील. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. भावंडांशी संपर्क होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ (वक्री), धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध(वक्री), भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरु, शनि व प्लूटोशी लाभयोग होईल आणि नेपचूनशी युती होईल. २८ तारखेला शुक्राचा चंद्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ३० तारखेला बुधाचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३१ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ छान आहे. जुन्या मित्रांच्या भेटी होऊ शकतील. काही लाभही होऊ शकतात. त्यानंतरचे २ दिवस खरेदीसाठी अनुकूल आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य लाभदायक घटनांचा असू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम हॊईल. व्यावसायिकांना नविन संधी मिळतील. सप्ताह अखेरीस आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काही लोकांना उष्णतेमुळे होणारे तोंड येणे, डोकेदुखी अशाप्रकारच्या समस्या जाणवतील.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group