अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२०) (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, धनस्थानात राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीचे दोन दिवस सोडले तर नंतर सप्ताह अनुकूल आहे. सोमवारी दुपारपर्यंत वाहने जपून चालवा. बोलण्यावरसुद्धा संयम या कालावधीत ठेवण्याची गरज आहे. तोंड येणे, डोकेदुखी, मायग्रेन, अ‍ॅसिडिटी अशा उष्णतेच्या आजारांचा त्रास संभवू शकेल. त्यानंतरचे २ दिवस लाभदायक आहेत. एखादा धनलाभ/ बक्षिस/ कौतुकाचे दोन शब्द उत्साह वाढवतील. सप्ताह मध्यानंतर प्रवासयोग संभवतात. भावंडांशी संवाद साधाल. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री), हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मन प्रसन्न असेल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सायनस/ सर्दी सारखे त्रास या काळात जाणवतील. काळजी घ्या.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री), हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. केलेल्या कामाचे चीज होइल. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. मात्र आरोग्याच्या समस्या या दरम्यान काहींना जाणवतील. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना चांगला काळ आहे. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. अचानक एखादा सन्मान/ भेटवस्तू मिळणे/ कोणाकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळणे असे योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या व्यक्तींबरोबर मजेत वेळ घालवाल. सप्ताहाच्या शेवटी अचानक खर्च उद्भवतील. नव्या गुंतवणूकीला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य नाही. तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, तृतियस्थानी बुध, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि, सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात थोडे जास्त काम करावे लागेल मात्र मात्र त्याचं चीजही होईल. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. ओळखींमुळे एखाद अडकलेलं कामही मार्गी लावू शकाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात बुध, तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, भाग्यस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, अष्टमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना चांगला काळ आहे. काही लाभ होतील. सप्ताह मध्य इंशूरन्सचे काम करणारे, इतिहासकार, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल कालावधी आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. वाहने जपून चालवा. गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, सप्तमस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवायाही वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कालावधी चांगला आहे. कवी व कलाकार यांना ग्रहमान अनुकूल आहे. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानक उद्भवतील. मुलांसाठी काही खरेदी कराल. विद्यार्थ्यांना कालावधी प्रतिकूल आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, पंचमस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहातील सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. यश मिळण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. नित्य उपासनेत लक्ष लागणार नाही. प्रेमी युगुलांसाठीही प्रतिकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरीच्या संधी मिळू शकतील. मात्र नेहमीच्या कामंकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. तब्येतही या काळात सांभाळावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, चतुर्थस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदी कराल. घरासाठी किंवा घरातील वस्तूंच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करा आणि आरोग्याची काळजी घ्या.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, तृतियस्थानी राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर हर्शलशी युती होईल आणि मंगळ वक्रगतीने मीन राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी त्रिकोण होईल. ७ तारखेला बुधाचा हर्शलशी प्रतियोग होईल. चंद्राचा ८ तारखेला मंगळाशी व ९ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी फ़ारसा चांगला नाही. सोशल मिडियावर काही पोस्ट करणार असाल तर या कालावधित विशेष काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group