अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२०)

(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, तृतियस्थानी राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री) आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहातील सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. एखादं छानसा बेत असेल. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा विकायची असेल त्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काहींना चांगले लाभ होतील. एखादं छान बक्षिस, प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकेल. प्रेमिकांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरी करणार्‍यांनी आपल्या कामात हयगय करु नये. तब्येतीचीही काळजी या काळात घेणे आवश्यक आहे. नविन गुंतवणूक करत असाल तर या काळात जपून व्यवहार करावेत.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात राहू, तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री), हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. कलाकार, कवी, लेखक, ब्लॉगर्स तसेच साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. याकाळात काहीतरी छान काम होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही योग काहींना संभवतात. सप्ताह मध्य बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल आहे. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. त्यामुळे आनंदी असाल. संततीसंदर्भातील एखादी छान घटना घडेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शुक्र, तृतियस्थानात सूर्य, चतुर्थस्थानात बुध, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, आणि लाभस्थानात मंगळ (वक्री), हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. गायकांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण आनंदी असेल. हातातील कामे लवकर उरकून आराम करण्याकडे कल असेल. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, तृतियस्थानी बुध, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. विशेषत: डोळ्यांची काळजी घ्यावी. खाद्यपदार्थ विक्रेते तसेच आहारतज्ञ यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. तसेच टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणार्‍यांना थोडाफ़ार दिलासा मिळू शकेल असे वाटते आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात बुध, पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), हर्शल आणि लाभस्थानात राहू व व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. एखादी छानशी खरेदी सुध्दा होईल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल त्यामुळे खुशीत असाल. नविन काही शिकायचं असेल तर त्याला अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. मित्रांशी संवाद साधाल. आवडत्या पदार्थांवर ताव माराल. एखादा पदार्थ स्वत:ही बनवून बघायला हरकत नाही.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, दशमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा गोष्टींपासून मात्र या काळात लांब रहा. कायद्याचं पालन करा. सप्ताहाचा शेवट खुप छान जाणार आहे. वरीष्ठ तुमचं कौतुक करण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. गायकांना हा काळ अतिशय अनुकूल आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, अष्टमस्थानात  राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक गोष्टी घडतील. न्यायसंस्था तसेच शिक्षणसंस्थेच्या संबंधीत लोकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात खुप चांगले काम कराल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. वडीलधारी मंडळींचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना एखादे फ़ायदेशीर काम दृष्टीपथात येईल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, षष्ठस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनासुध्दा चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. जोखिम असलेली कामे अजिबात करु नका. वाहने जपून चालवा. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध,  लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराला धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शुक्र षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग आणि शनि व प्लूटोचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरु व हर्शलशी त्रिकोण होईल आणि सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व चंद्राची युती होईल. १८ तारखेला शुक्राचा चंद्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळ व सुर्य यांचा षडाष्टक होईल, चंद्र व बुध यांची युती होईल आणि राहू वृषभेत तर केतू वृश्चिक राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे.  नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आनंद देणार्‍या घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकुल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)