अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ फ़ेब्रुवारी ते २२ फ़ेब्रुवारी २०२०) 

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, भाग्यात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, दशमात शनि, लाभात बुध, रवि व नेपचून आणि व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. मनाचा तोल जाऊ देऊ नये. वाहने हळू चालवावीत. इन्शुरन्सचे काम करणारे, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रातील परिस्थिती अनुकूल असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, अष्टमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, भाग्यात शनि, दशमात रवि, बुध, नेपचून, लाभात शुक्र आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. या काळात वाहने जपून चालवा. जोखिम असलेली कामे टाळा. मात्र मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार इ. लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग आहेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, अष्टमात शनि भाग्यात रवि, बुध, नेपचून, दशमात शुक्र आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात अ‍ॅसिडिटी/ पॊटाच्या तक्रारींनी होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांनी तुर्तास आहे तीच नोकरी टिकेल असाच प्रयत्न करावा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. वाद वाढणार नाहीत याची काळजी घेतलेली बरी. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांनी आपल्या भागीदरीला या काळात गृहित धरु नये. गैरसमज व्हायला छोट्या गोष्टीसुध्दा पुरतात हे लक्षात ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. वाहने जपून चालवा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, सप्तमात शनि, अष्टमात रवि, बुध, नेपचून, भाग्यात शुक्र, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडे लक्ष द्या. त्यांना तुमच्या मदतीची/ सल्याची गरज भासू शकेल. विद्यार्थ्यांना ग्रहमान तितकेसे अनुकूल नाही. अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स, कमोडिटीसारख्या व्यवहारांपासून सध्या लांबच राहिलेले बरे. प्रेमिकांनाही हा कालावधी चांगला नाही. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. मात्र हा काळ वकील व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, षष्ठात शनि, सप्तमात रवि, बुध, नेपचून, अष्टमात शुक्र, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली असेल. मन आनंदी असेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मौज-मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांसाठी अनुकूल कालावधी आहे. चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. एखादं बक्षिस/ धनलाभही होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. विशेषत: वातविकार, गुढगे/ पाठदुखीचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. वकील किंवा कायदाविषयक कामे करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, पंचमात शनि, षष्ठात रवि, बुध, नेपचून, सप्तमात शुक्र, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. देऊन खुश कराल. भागीदारीत व्यवसाय नव्याने सुरु करायचा असेल तर अनुकूल ग्रहमान आहे. लाभदायक घटना घडण्याची शक्यता आहे. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटीचे योग येतील. साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. लेखकांना व खेळाडूंना छान काळ आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकूल आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मस्त पार्टीचा मूड असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना यशासाठी झगडावे लागू शकेल. शेअर मार्केट/ कमोडीटी सारख्या क्षेत्रात सध्या जोखिम पत्करु नका.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, चतुर्थात शनि, पंचमात रवि, बुध, नेपचून, षष्ठात शुक्र, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास सुखकर होतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. घरात आनंदी वातावरण असेल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची चांगली मदत मिळेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, तृतिय स्थानात शनि चतुर्थात रवि, बुध, नेपचून, पंचमात शुक्र, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात संमिश्र घटनांची असेल. एखादा धनलाभ संभवतो मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. अ‍ॅसिडिटी/ डोळ्यांच्या किरकोळ तक्रारी या काळात जाणवतील. सप्ताह मध्य तुमच्यासाठी मस्त असेल. जुन्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले राहील. चमचमीत पदार्थ खाणे तुम्हाला आवडते. घरात छानशी पार्टी करायला हरकत नाही. मात्र खाण्या-पिण्यावर वर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कवी, ब्लॉगर्स यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. ज्यांचा व्यवसाय फ़िरस्तीचा असेल त्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, धनस्थानी शनि, तृतियस्थानात रवि, बुध, नेपचून, चतुर्थात शुक्र, पंचमस्थानात हर्षल, आणि सप्तमस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान उत्तम असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. घर किंवा घरासाठी लागणार्‍या गोष्टींच्या खरेदीसाठी अनुकूल कालावधी आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहा. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर संमिश्र घटनांचा काळ आहे. एखादा धनलाभ होऊ शकेल. मात्र तब्येतीच्या काही किरकोळ तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, धनस्थानी रवि, बुध, नेपचून, तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, आणि व्ययस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मात्र एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदीचे योग आहेत. पुर्वी केलेल्या कामापासून किंवा गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. नृत्यकलेशी संबंधितांना तसेच ज्यांना आपली प्रॉपर्टी विकायची आहे त्यांना ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. काही लाभ होऊ शकतात.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, नेपचून, धनस्थानी शुक्र, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, लाभस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो आणि व्ययस्थानी शनि अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम ग्रहमान असणार आहे. परदेशगमनासाठीही चांगला कालावधी आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, लाभस्थानी शनि आणि व्ययस्थानी रवि, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकॊण होईल. १८ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल व चंद्र- मंगळ युती होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व नेपचूनशी लाभयोग होईल आणि चंद्र-गुरु युती होईल. २० तारखेला चंद्र-शनी व चंद्र-प्लूटो युती होईल. २२ तारखेला रविचा हर्षलशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #astrologer #astrologymemes #astro #astrologyposts #numerology #vastu #follow  #राशिभविष्य #ज्योतिषशास्त्र #अ‍ॅस्ट्रोशोध #भविष्य #ज्यितिषी #astrologerinpune