अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमस्थानात रवि, बुध, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. एखादं छानसं गेट टुगेदर किवा घरात मस्त पार्टी आयोजित करायला हरकत नाही. ज्यांना प्रॉपर्टी विकायची असेल त्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काहींना चांगले लाभ होतील. एखादं छान बक्षिस, प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकेल. प्रेमिकांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी कायदेविषयक कामांसाठी प्रतिकूल आहे. नोकरी करणार्‍यांनी आपल्या कामात हयगय करु नका. तब्येतीचीही काळजी या काळात घेणे आवश्यक आहे. नविन गुंतवणूक करत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, अष्टमात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी प्रतिकूल आहे. शक्यतो व्यवहार काही दिवस पुढे लोटलेले बरे. बांधकाम व्यावसायिकांनाही प्रतिकूल ग्रहमान आहे. घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आईच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. त्यामुळे आनंदी असाल. संततीसंदर्भातील एखादी छान घटना घडेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, पंचमात मंगळ, बुध, षष्ठात रवि, सप्तमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आरोग्याविषयक काही समस्या जाणवतील. विशेषत: दमा, सर्दी, सायनस याचा त्रास असणार्‍यांनी जास्त काळजी घ्यावी. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना मात्र अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, षष्ठात गुरु, शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. विशेषत: डोळ्यांची काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच आहारतज्ञ यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स तसेच टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे यांना ग्रहमान खूप अनुकूल आहे. एखादं बक्षिस, कौतुकाची एखादी अचानक मिळालेली थाप, धनलाभ असे योग काहींना येणार आहेत. प्रेमी जीवांसाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, पंचमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. एखादी छानशी खरेदी होईल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. विद्यार्थी, उपासक व वकील यांना चांगले ग्रहमान आहे. आपल्या छंदांना जरुर वेळ द्या. नविन काही शिकायचं असेल तर त्यालाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. जुने मित्र भेटतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात रवि, बुध, चतुर्थात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. परदेशगमनासाठीही अनुकूल कालावधी आहे. धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट खुप छान जाणार आहे. धनलाभ होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना विशेषत: गायकांना हा काळ अतिशय अनुकूल आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास    
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानी रवि, बुध, तृतिय स्थानात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, धनस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी मंगळ आणि व्ययस्थानी रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. काही भाग्यवर्धक गोष्टी घडतील. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात दुर्लक्ष किंवा हयगय करु नका. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी येतो त्यांना मात्र हा काळ खूप चांगला आहे. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, दशमात मंगळ, लाभस्थानी रवि, बुध, आणि व्ययस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमस्थानी रवि, बुध आणि लाभस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी रवि, बुध दशमस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. १६ तारखेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा शनीशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे.  नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकुल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध
#भविष्य