अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१९)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, बुध, अष्टमस्थानात रवि, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. काहींना जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. नित्यउपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोक तसेच न्यायाधीश यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, बुध, सप्तमात रवि, अष्टमात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताह थोडा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्यात अडथळे येऊ शकतत. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना व वकीलांना हा काळ संमिश्र आहे. नोकरीबदल किंवा नवीन नोकरीसाठी हा काळ फ़ारसा अनुकूल नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराला जपा. जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज असू शकेल. भागीदारीत व्यवसाय असेल तर कुठल्याही प्रकारे लपवाछपवी महागात पडू शकते. सप्ताह अखेरीस वाहने जपून चालवावीत. मात्र ज्योतिषी, इतिहासकार, विमा प्रतिनिधी यांना अनुकूल ग्रहमान आहे. एखादा अचानक धनलाभही शक्य.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, पंचमात मंगळ, बुध, षष्ठात रवि, सप्तमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वाद टाळा. अती दगदग टाळावी. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, बुध, पंचमात रवि, षष्ठात गुरु, शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे मात्र कागदपत्रांची तपासणी तज्ञ व्यक्तीकडून केल्याशिवाय व्यवहार नकोत. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व प्रेमिकांसाठी अनुकूल आहे. उपासना, ध्यानधारणा मनाप्रमाणे होईल. काही अध्यात्मिक अनुभव शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील तसेच फ़िजिकल फ़िटनेससंबंधी काम करणारे लोक यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, बुध, चतुर्थात रवि, पंचमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहे. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी, प्रकाशक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. कलाकार, खेळाडूंचीही विशेष प्रगती होऊ शकते.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, बुध, तृतियस्थानात रवि, चतुर्थात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ संभवतो. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर व आनंद देणारे ठरतील. लेखक, खेळाडू यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. उद्योग व्यवसायामध्ये सुरुवातीला लागलेला चांगला सूर सप्ताहाच्या शेवटीही जाणवत राहील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, बुध, धनस्थानी रवि, तृतिय स्थानात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूलता असेल. गूढ गोष्टींकडे मन ओढले जाऊ शकते. प्रवास करणार असाल तर आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवि यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. आपल्या आवडीच्या व्यक्तींसाठी खास भेटवस्तू घ्यायला हरकत नाही. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी. ऊपासना करणार्‍यांना विशेष अनुकूलता आहे. सप्ताह मध्यात उगीचच कुठल्यातरी गोष्टींची चिंता वाटत राहील. डोकेदुखी/ मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्यावी. आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी मंगळ, बुध आणि व्ययस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना धनलाभ संभवतात. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात काही खर्च करावे लागतील. पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतात. ज्यांच्या नोकरी/ व्यवसायाचा संबंध परदेशाशी आहे अशांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट मनाविरुध्द घटनांचा ठरु शकेल. आपल्या चीजवस्तु सांभाळा. परदेश प्रवास करण्यासाठी मात्र अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, दशमात मंगळ, बुध, लाभस्थानी रवि आणि व्ययस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरिष्ठांकडून बक्षिस/ शाबासकी मिळू शकेल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या भेटी होतील. छान गेट-टुगेदर करायला हरकत नाही. प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, भाग्यस्थानी मंगळ, बुध, दशमस्थानी रवि आणि लाभस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, अष्टमात मंगळ, बुध, भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी आणि शुक्राशी लाभयोग होईल तसेच गुरु व शुक्राची युतीही होणार आहे. २५ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी व शुक्राशी युती होईल. २९ तारखेला चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. ३० तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला वाहने जपुन चालवावीत. मात्र इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. काहींना सुचक स्वप्ने पडू शकतात. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. धनलाभही होतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group