अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, बुध, अष्टमस्थानात रवि, शुक्र भाग्यात गुरु, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्य धार्मिक गोष्टींसाठी चांगला आहे. संततीसंबंधी काळजी वाटत राहील. विद्यार्थ्यांना ग्रहमान प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास बाळगू नका. कलाकार व खेळाडूंना यशासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. जोडीदाराशी वाद टाळावे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, बुध, सप्तमात रवि, शुक्र अष्टमात गुरु, शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
आठवडा छान जाणार आहे. चागले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. छान पार्टीचा मूड असेल. काहींना प्रवासयोग संभवतात. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर घरासाठी/ घरातील वस्तुंच्या डागडुजीसाठी खर्च करावा लागेल. आपले काही छंद असतील किंवा नवीन विषय शिकायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, पंचमात मंगळ, बुध, षष्ठात रवि, शुक्र सप्तमात गुरु, शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनासारखी खरेदी होईल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. जोडीदारबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कांमांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, बुध, पंचमात रवि, शुक्र षष्ठात गुरु, शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल. छान मेजवानीचे बेत आखाल. मात्र एक प्रकारची हुरहुर किंवा एखाद्या गोष्टीची चिंता विनाकारण वाटत राहील. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादा धनलाभ संभवतो. मुलांबाबत चांगली बातमी कळेल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना अत्यंत अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर काहींना भाग्यवर्धक घटनांची ठरेल. प्रवासासाठीही अनुकूल काळ आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी तसेच लेखकांना छान ग्रहमान आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, बुध, चतुर्थात रवि, शुक्र पंचमात गुरु, शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. अध्यात्मिक मार्गातील लोकांना चांगले अनुभव येतील. सप्ताह मध्यात प्रियजनांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. घरात पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. कलाकार, वादक, कवी यांच्यासाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकतो.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, बुध, तृतियस्थानात रवि, शुक्र, चतुर्थात गुरु, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छान ग्रहमान आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात मनाजोगते काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आप्तेष्ठांची किंवा मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात काही खर्च करावे लागतील. तब्येतीच्या काही तक्रारीही जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. दुस‍र्‍यांच्या चुका काढणं या कालावधीत कटाक्षाने टाळा.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, बुध, धनस्थानी रवि, शुक्र, तृतिय स्थानात गुरु, शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मनासारखे काम झाल्याने वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. प्रेमिकांना हा काळ अनुकूल आहे. कलाकारांना त्यांच्या कलेचा चांगला मोबदला या काळात मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीला जपावे. बेकायदेशीर कृत्ये टाळावीत अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शुक्र धनस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
रविवारी दुपारपर्यंतचा काळ सोडल्यास सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल.  काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मनासारखे काम होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी मंगळ, बुध आणि व्ययस्थानी रवि, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
रविवारी संध्याकाळपर्यंतचा कालावधी चांगला आहे. काही लाभ होण्याची शक्यता आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. नंतर मंगळवारी रात्रीपर्यंतचा   काळ कंटाळवाणा व कटकटीचा असला तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. एखादं अचानक मिळालेलं गिफ़्ट/ बक्षिस मनाला आनंद देऊन जाईल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. नवनवीन कल्पना सुचतील. सप्ताहाचा शेवट चांगला असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, दशमात मंगळ, बुध, लाभस्थानी रवि, शुक्र, आणि व्ययस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य. गुरुची उपासना जरुर करावी. धनलाभाचे योग येतील. प्रवासाचेही योग आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, भाग्यस्थानी मंगळ, बुध, दशमस्थानी रवि, शुक्र आणि लाभस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ विद्यार्थ्यांना व कलाकारांना उत्तम आहे. नंतर मंगळवारी रात्रीपर्यंतचा काळ तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. बर्‍याच काळापासुन अडकलेले पैसे अचानकपणे मिळू शकतील. इऩ्शूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. मात्र प्रवासासाठी प्रतिकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, अष्टमात मंगळ, बुध, भाग्यस्थानी रवि, शुक्र, दशमस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी व शुक्राशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्र धनु राशित प्रवेश करेल. २२ तारखेला रविचा चंद्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. सप्ताह मध्य नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व नोकरीबदल करायची इच्छा असेल त्यांना अनुकूल आहे. वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील, न्यायधीश यांना ग्रहमान अनुकूल आहे. नविन गुंतवणुक करणार असाल तर त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे नीट बघून व योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणुक करावी. शेअर मार्केट/ कमोडिटी अशा जोखिम असलेल्या व्यवहारांपासून सध्या लांबच राहिलेले बरे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळा. शारीरिक तक्रारींचा काळ असू शकेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध