अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१९)                      

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, अष्टमस्थानात शुक्र भाग्यात गुरु, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
रविवारचा दिवस खर्च वाढवणारा असेल. काही काळज्याही असतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमवाल. सोमवार आणि मंगळवार रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखी/ मायग्रेनसारख्या आजारांचा त्रास संभवतो. सप्ताह मध्यात जोखिम असलेली कामे टाळावीत. वाहने जपून चालवावीत. जॊडीदाराशी वाद टाळा. काहींना धनलाभाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. लाभदायक योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम हॊईल. वरीष्ठ खुष असतील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, पंचमात मंगळ, षष्ठात रवि, बुध, सप्तमात शुक्र अष्टमात गुरु, शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
रविवा्री दुपारपर्यंत मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचा योग असेल. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरु शकतो. काळजी घ्यावी. खर्च वाढतील. शत्रूपीडा जाणवू शकते. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडू शकतात. कुटूंबासमवेत वेळ छान जाणार आहे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकेल. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो. कोणाचं मन या काळात दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, षष्ठात शुक्र सप्तमात गुरु, शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम झाल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. वरीष्ठ आपल्यावर खुष असणार आहेत. मित्र भॆटतील. काही मानसन्मान किंवा लाभही अपेक्षित आहेत. सप्ताह मध्यात मनासारख्या खरेदीचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशगमनासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नर्तन कलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. काहींना धनलाभ शक्य.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, पंचमात शुक्र षष्ठात गुरु, शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस घरगुती सौख्याचे असतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. कलाकार, विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. कमी श्रमात चांगलं काम होईल. प्रेमिकांना छान काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना काळ चांगला आहे. लेखक/ ब्लॉगर्स यांनी या कालावधीत वादग्रस्त लिखाण टाळावे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात मंगळ, तृतिय स्थानात रवि, बुध, चतुर्थात शुक्र पंचमात गुरु, शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
रविवारचा दिवस आपल्या छंदांसाठी द्या. काहींना सूचक स्वप्ने पडतील. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. प्रवासयोग संभवतात. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. एखादं बक्षिस/ भेटसस्तू सुखावून टाकेल. प्रेमी जीवांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांना विशेष चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. छान लाभ झाल्याने प्रसन्न असाल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानी रवि, बुध, तृतियस्थानात शुक्र, चतुर्थात गुरु, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. प्रवासात काळजी घ्या. सर्जन/ थेरपिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. घरात काही बदल करायचे असतील/ सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट धनलाभाचा ठरु शकेल. घरात छान बेत ठरतील. चांगले ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, धनस्थानी शुक्र, तृतिय स्थानात गुरु, शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. प्रवासयोग येतील. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. आपले खिसा पाकिट सांभाळावे. खर्च वाढणार आहेत. पायाला दुखापत होऊ नये म्हणून जपावे. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि लाभस्थानी मंगळ, व्ययस्थानात रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
रविवारचा दुपारपर्यंतचा दिवस चांगला आहे. नंतर मंगळवारपर्यंत तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी/ पोटाच्या काही तक्रारी असतील तर विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मित्रांबरोबर वाद टाळावेत. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना मात्र हा काळ अतिशय लाभदायक असेल. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरात छान वातावरण असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इन्शुरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू दशमात मंगळ, लाभस्थानी रवि, बुध आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश असे समीकरण असेल. सप्ताह मध्यात नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. कफ़ाचा काही त्रास असेल तर हा काळ थोडासा त्रासदायक आहे. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमात रवि, बुध, लाभस्थानी शुक्र, आणि व्ययस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
रविवारचा दुपारपर्यंतचा दिवस प्रतिकूल आहे. त्यानंतर एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांना यशादायक ग्रहमान आहे. कलाकार व खेळाडूंना यांना अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस नोकरदार व्यक्तींवर वरीष्ठांची चांगली मर्जी राहील. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी रवि, बुध, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील तर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखकांना ग्रहमान अनुकूल आहे मात्र या काळात वादग्रस्त लिखाण टाळा. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना चांगली आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमात रवि, बुध, भाग्यस्थानी शुक्र, दशमस्थानी गुरु, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळ तुळ राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग तारखेला होईल. ११ तारखेला रविची बुधाशी व चंद्राची हर्षलशी युती होईल. १२ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल व मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल. रवि तुळ १६ राशित प्रवेश करेल. १५ तारखेला गुरुचा चंद्राशी प्रतियोग होईल.
रविवार दुपारपर्यंतचा काळ छान आहे. नंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. डोळ्यांची काळजी या काळात घ्यायला हवी. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. त्यांच्याकडून काही लाभही होऊ शकतील. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. अती दगदग टाळावी. प्रॉपर्टीच्या कामांसाठी मात्र प्रतिकूल काळ आहे. शक्यतो असे व्यवहार काही दिवस पुढे ढकललेलेच बरे. प्रवासासाठीही प्रतिकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध