अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ जुलै ते २७ जुलै)        

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात शुक्र, राहू, चतुर्थात रवि, मंगळ, बुध, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. काही जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. काही लाभही होऊ शकतील. सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगला आहे. परदेशात जायचं असेल तर अनुकुल काळ आहे. गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहू शकेल. नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात शुक्र, राहू, तृतिय स्थानात रवि, मंगळ, बुध, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
संपूर्ण सप्ताह एकूणच छान जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल त्यामुळे प्रसन्न असाल. वरीष्ठही आपल्यावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने पार्टीचा मूड असेल. जुन्या मित्रांची भॆट शक्य आहे. प्रेमिकांना विवाह बंधनात अडकण्यास अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. वाहने सावकाश चालवा. सप्ताह अखेर लाभदायक घटना शक्य आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात शुक्र, राहू, व्दितिय स्थानात रवि, मंगळ, बुध षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांनी होऊ शकते. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांशी जुळवुन घ्यावे लागेल. सहकार्‍यांशी किंवा वरीष्ठांशी वाद होतील असे वर्तन होऊ देऊ नका. आरोग्याच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. काही अनपेक्षित लाभ होतील मात्र एखाद्या मित्राच्या/ आप्ताच्या विचित्र वागण्याने त्रास होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवट धनलाभाचा ठरु शकेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, मंगळ, बुध, पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. तब्येतीची काळाजी घ्यावी. वातविकार व हाडांसंबंधी काही आजार असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सोमवार, मंगळवार चांगले जातील. भाग्यवर्धक घटना शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. बढती किंवा पगार वाढीसाठीही अनुकुल काळ आहे. विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकुल आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्यात आपला इगो व राग या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. छान खरेदीचे योग आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी शुक्र, राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. विध्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास बाळगू नये. प्रामाणिक कष्टांना व परीश्रमांना पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. सप्ताह मध्यात धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र प्रवासात स्वत:ची व आपल्या चीजवस्तुंची काळजी घेणं गरजेचे आहे. सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा असू शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी शुक्र, राहू आणि लाभस्थानी रवि, मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी व वकिलांसाठी चांगली. तब्बेतीच्या कुरबुरी जाणवत रहातील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. प्रेमिकांसाठी अनुकुल काळ आहे. काहींना मस्त प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. कलाकार व खेळाडू यांना अनुकुल कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी शुक्र, राहू आणि दशमस्थानी रवि, मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नविन काही शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रवासाचे योग संभवतात. भावंडे किंवा आप्तेष्ट यांच्या भेटी होतील. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वकील व न्युट्रीशियन्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या जीवलगांबरोबर मजेत वेळ जाणार आहे. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी समजेल. भागीदारीत व्यवसाय करणा‍र्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा शेवटी धोका असलेली कामे करू नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात शुक्र, राहू आणि भाग्यस्थानी रवि, मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराच्या काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, राहू, अष्टमात रवि, मंगळ, बुध, आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीचे व्यवहार टाळलेलेच बरे. परदेशगमन ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी अनुकूल ग्रहामान आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील.
उपासना: कालभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात शुक्र, राहू, सप्तमस्थानी रवि, मंगळ, बुध, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवावे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना चांगला कालावधी आहे. आपल्या कार्याची प्रशंसा लोक करतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही होतील. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्याने खूश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आरोग्याची काळजी घ्यावी. सर्दी, कफ़ासारख्या विकारांचा त्रास होऊ शकतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात शुक्र, राहू, षष्ठात रवि, मंगळ, बुध, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. धनलाभाचे योग येतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकाल. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. सप्ताहाच्या मध्यात भावंडांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांच्याशी काही वाद असतील तर ते वेळीच मिटवावेत. लेखक/ वक्त्यांनी या काळात लोक दुखावतील असे लिहिणे/ बोलणे टाळावे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी फ़ायदेशीर ठरेल. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना शक्य.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी शुक्र, राहू, पंचमात रवि, मंगळ, बुध, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २३ तारखेला शुक्र कर्केत प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाची शुक्राशी युती होईल आणि २५ तारखेला मंगळाचा गुरुशी त्रिकोण होईल.
रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सोमवार, मंगळवार भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. प्रवासाचे बेत ठरतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. सप्ताह मध्य चांगला आहे. काही धनलाभ होऊ शकतील. विद्यार्थी व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान अहे. काहींना धनलाभाचे योग येतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर कवी, लेखक यांच्यासाठी काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध