अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० जून ते ६ जुलै)            

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात रवि, शुक्र, राहू, चतुर्थात मंगळ, बुध, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काहींना पती/ पत्नीच्या संदर्भातील शुभ वार्ता समजतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात घरगुती प्रश्नांसाठी वेळ काढा. सोशल मिडियावर वादद्रस्त लिखाण टाळा. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रेमात पडलेल्यांना लग्न ठरविण्यास अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, शुक्र, राहू, तृतिय स्थानात मंगळ, बुध, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
एकंदरीतच सप्ताह चांगला आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताहाच्या सुरूवातीस नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अतिशय चांगला कालावधी आहे. जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. गायक, आहारतज्ञ, थेरपिस्ट यांना अनुकूल ग्रहमान आहे. आरोग्याच्या मात्र काही समस्या जाणवू शकतात. सर्दी/ कफ़ किंवा मूत्रविकाराचा त्रास संभवतो. सप्ताह मध्यात कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, कलाकार, इस्टेट ब्रोकर्स यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात रवि, शुक्र, राहू, व्दितिय स्थानात मंगळ, बुध षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकुल असेल. कुटुंबीयांसह छान खरेदीला जायला हरकत नाही. पारमार्थिक उन्नती करणाऱ्यांसाठी उत्तम असणार आहे.
सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. केलेल्या कामाचा मोबदला चांगला मिळणार आहे. थोडा वेळ स्वत:साठीही जरुर काढा. घरातील बिलंवित कामे काही असतील तर त्यालाही वेळ द्यावा लागेल. सप्ताहाच्या अखेरीस लेखक, ब्लॉगर्स, कवी व गायक यांना चांगला काळ आहे. या काळात केलेले प्रवास फ़ायदेशीर व मनाला आनंद देणारे असतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, बुध, पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी रवि, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. परदेशगमन ज्यांना करायचे आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. मनाविरुध्द काही घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. काही धनलाभ होतील. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी रवि, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर वादविवाद टाळावेत. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो. काही अपेक्षित असलेले लाभ विनाकारण लांबण्याची शक्यता आहे. बेकायदा गोष्टी या काळात टाळा. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. परदेशगमन करायचे असल्यास अनुकूल कालावधी आहे. परदेशाशी संबंधीत काही कामे मार्गी लागू शकतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी रवि, शुक्र, राहू आणि लाभस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी रवि, शुक्र, राहू आणि दशमस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ईन्शुरन्सचे काम करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे.  सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात रवि, शुक्र, राहू आणि भाग्यस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराची काळजी घ्या. जोडीदाराला काही शारीरीक त्रास असतील तर दुर्लक्ष करु नका. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा असू शकतो. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही तक्रारी जाणवतील. विमा व्यावसायिकांना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी रवि, शुक्र, राहू, अष्टमात मंगळ, बुध, आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्‍यांसाठी फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात रवि, शुक्र, राहू, सप्तमस्थानी मंगळ, बुध, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. कलाकारांसाठीही फ़ारसा चांगला काळ नाही. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र अनुकूल कालावधी आहे. नोकरदार व्यक्तींनी वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. नविन नोकरीच्या शोधात असाल तर अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात रवि, शुक्र, राहू, षष्ठात मंगळ, बुध, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला चांगले ग्रहमान आहे. घरात प्रसन्नता असेल. काहींना गुरुकृपेचा लाभ होईल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना तितकासा अनुकूल नाही. यशासाठी प्रयत्नांना पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. आपल्या मुलांना आपल्या मदतीची गरज तर लागत नाहीये ना याची खातरजमा करुन घ्या. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी रवि, शुक्र, राहू, पंचमात मंगळ, बुध, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल, १ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल, ३ तारखेला चंद्राचा शनीशी प्रतियोग होईल, ४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकुल काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रह्मान आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात थोडीफ़ार गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र कुठलिही जोखिम टाळा. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. केलेल्या कष्टाचे चीज होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध