अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ जून ते ८ जून)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, व्दितिय स्थानात रवी, तृतिय स्थानात मंगळ, बुध, राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनी, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहेत. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग संभवतात. छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. लाभदायक प्रवासाचे योग येऊ शकतात. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या व्यवहारास अनुकूल काळ आहे. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग संभवतात. संपूर्ण सप्ताह कलाकारांना विशेषत: गायकांना अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, व्दितिय स्थानात मंगळ, बुध, राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनी, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशगमन ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. नृत्यकलेशी संबंधीत लोकांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर भावंडाच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ कलाकार/ कवी यांना काळ चांगला आहे. प्रवास फ़ायदेशीर ठरतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, बुध राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनी, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, लाभस्थानी शुक्र, हर्षल आणि व्ययात रवी अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही खर्चही अचानक उद्भवू शकतात. चैन करण्याकडे कल असेल. अध्यात्मिक मार्गात अडथळे जाणवतील. परदेशी कंपनीशी संबंधीत केलेल्या व्यवहारातून चांगला फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. प्रॉपर्टीचे व्यवहार फ़ायदेशीर ठरतील. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांसाठी वेळ काढा. घरातील वातावरण छान असेल. एखादा धनलाभ शक्य आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनी केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात शुक्र, हर्षल लाभस्थानी रवी,  आणि व्ययस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगले अनुभव येतील. परदेशगमन करायचं असेल तर जरुर प्रयत्न करावे. भावंडांशी वाद संभवतात काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. तुमचा प्रभाव वाढेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनी, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात शुक्र, हर्षल दशमस्थानी रवी, आणि लाभस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकुल ग्रहमान आहे. चांगले काम घडल्याने वरीष्ठ खुश असतील. एकादी मागणी वरीष्ठांकडे करण्यासाठी अनुकूल काळ आहे. कामानिमित्त काहींना प्रवासयोग संभवतील. सप्ताह मध्य आर्थिक लाभाचा मात्र काहींना पैशांच्या कामाला अचानक विलंब होऊ शकतो. मोठे व्यवहार या काळात न केलेले बरे. काहींना मित्राच्या किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताह अखेरीस काही खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनी, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात शुक्र, हर्षल भाग्यस्थानी रवी, आणि दशमस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ शक्य. काहींना प्रवासयोग येऊ शकतील. धार्मिक गोष्टींसाठी हा कालावधी चांगला आहे. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह मध्यात छान काम कराल. केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळू शकेल. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. पैशांची कामे मार्गी लागतील. चांगला काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनी, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात शुक्र, हर्षल, अष्टमात रवी, आणि भाग्यस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात तितकिशी चांगली नाही. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींनी त्रस्त व्हाल. जोडीदाराचे काही प्रश्न किंवा समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योगही संभवतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगल्या घटना घडतील. मनासारखे काम झाल्याने खुष असाल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल, सप्तमस्थानी रवी, आणि अष्टमात मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असेल. जोडीदाराशी वाद टाळा. काही वाद असतील तर ते विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी व्यवहार स्वच्छ ठेवावेत. सप्ताह मध्यात अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. थेरपिस्ट/ अ‍ॅक्यूपंक्चर/ सुजोक या क्षेत्राशी संबंधित काम करणार्‍या लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यकारक घटना शक्य आहेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठात रवी, सप्तमस्थानी मंगळ, बुध, राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला नोकरदार व्यक्तींना लाभदायक काळ आहे. जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा होईल. थेरपिस्ट/ वैद्यकीय व्यवसाय करणारे, फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रामधे काम करणारे, आहारतज्ञ आणि वकील या सर्वांनाच हा काळ चांगला आहे. अचानक काही लाभही होऊ शकतात. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतात. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र अनुभव येतील. वाहने जपून चालवावीत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, पंचमात रवी, षष्ठात मंगळ, बुध, राहू आणि लाभस्थानी वक्री गुरु, व्ययस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांना व विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. प्रेमिकांनाही काळ अनुकूल आहे. नविन विषयाचा अभ्यास/ ट्रेनिंग घेण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. हितशत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे लोक तसेच फ़ार्मासिस्ट यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी रवी, पंचमात मंगळ, बुध, राहू, दशमस्थानी वक्री गुरु, लाभस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला  काळ आहे. केलेल्या उपासनेचे चांगले परीणाम जाणवू लागतील. गुरु उपासनेसाठी चांगला कालावधी आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना व लेखकांना चांगला जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वरीष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. कुठल्याही गोष्टींचा जास्त विचार करुन स्वत:ला त्रास करुन घेऊ नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, हर्षल, तृतियस्थानात रवी, चतुर्थस्थानी मंगळ, बुध, राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्राचा प्लूटोशी त्रिकोण होईल. ४ तारखेला शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुधाचा हर्षलशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. प्रवास लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. लेखक, कवी, ब्लॉगर्स यांना उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या हातुन छान काम झाल्यामुळे लोक कौतुक करतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. विद्यार्थ्यांना ग्रहमान चांगले आहे.
उपासना: महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध