अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ मे ते १८ मे)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, शुक्र, हर्षल, तृतिय स्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनी, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्य बक्षिसामुळे खुश व्हाल. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्य वकील, नेते, फ़ार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडुन काही लाभ संभवतात. प्रेमिकांनाही छान काळ आहे.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात मंगळ, राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनी, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी रवी, बुध, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
रविवार सकाळ प्रवासासाठी अनुकूल आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंत प्रॉपर्टीची कामे करण्यासाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. मनाविरुध्द काही घटना घडू शकतील. घरातील शांतता बिघडणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात तुमच्या मुलांना वेळ द्या. त्यांचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास सध्या बाळगू नये. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांनाही चांगला काळ आहे. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनी, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी रवी, बुध, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर  काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिंकांना काळ अनुकूल आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनी केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात रवी, बुध, शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मन आनंदी असेल. घरातील वातावरणही प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी मौज मजेचे प्रसंग घडतील. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनी, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात रवी, बुध, शुक्र, हर्षल आणि लाभस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
अतिशय छान सप्ताह आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल. रविवार सकाळ खरेदीसाठी चांगली आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ प्रवासासाठी अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र आपली मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. काहींना धनलाभाचे योग संभवतात. प्रवासासाठी अनुकुल काळ आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा प्रवासाचे योग आहेत.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनी, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात रवी, बुध, शुक्र, हर्षल आणि दशमस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
रविवारची सकाळ एकदम मस्त असेल. आवडती माणसं भेटतील. काहींना धनलाभाचे तर काहींना प्रवासाचे योग आहेत. त्यानंतर मंगळवारपर्यंत सतत खर्चाचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात असाल तर आपल्या चीजवस्तू सांभाळा. सप्ताह मध्यात बेकायदा कसलीही कामे करु नका. वरीष्ठ नाराज होतील असे वर्तन टाळावे. वाहनांची काळजी घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह अखेर मन प्रसन्न असेल.
मौज-मजेकडे कल असेल.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनी, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात रवी, बुध, शुक्र, हर्षल, आणि भाग्यस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. धनलाभ होतील. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आवडत्या लोकांच्या सहवात रहाण्याचे योग येतील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाराबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशगमनासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नर्तन कलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात रवी, बुध, शुक्र, हर्षल, आणि अष्टमात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
रविवारची सकाळ चांगली असेल. नंतर मात्र पूर्ण सप्ताह संमिश्र जाणार आहे. वरीष्ठ नेमके आपल्याच कामात चुका शोधतील. नको असलेल्या जबाबदार्‍या अंगावर येऊन पडतील. तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. मनाविरुध्द काही खर्च करावे लागतील. हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. वैद्यकीय व्यावसायिक व ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना मात्र ग्रहमान अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणारे व ज्यांना नोकरी बदल करायचा आहे त्यांना चांगला काळ आहे.
उपासना: मारुतीची उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात रवी, बुध, शुक्र, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी बुध, रवी, शुक्र, हर्षल, षष्ठात मंगळ, राहू आणि लाभस्थानी वक्री गुरु, व्ययस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. तब्येत सांभाळावी. वाहने हळू चालवावी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. उत्तम प्रवासाचे योग येतील. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. प्रॉपर्टीच्या बाबतीतही अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट उत्त्म असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खुष असतील. प्रमोशन/ पगारवाढ/ बदली यासाठी वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात रवी, बुध, शुक्र, हर्षल, पंचमात मंगळ, राहू, दशमस्थानी वक्री गुरु, लाभस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सायनस/ सर्दी अशा स्वरुपाच्या आजाराची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकुल आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींना गुरुकृपा शक्य.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात रवी, बुध, शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि वृषभ राशित प्रवेश करेल. १६ तारखेला बुधाचा शनीशी त्रिकोण होईल आणि नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्राची हर्षलशी युती होईल आणि बुध वृषभ राशित प्रवेश करेल.
रविवारची सकाळ छान असेल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. वडीलधारी मंडळींकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. नंतर मंगळवार पर्यंतचा काळ नोकरीच्या शोधात असणार्‍यांना चांगला आहे. जुन्या गुंतवणूकीतून लाभ होतील. फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम कर्णार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीबाबत थोडी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराकडून काही लाभ होतील. मन प्रसन्न असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध