अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ एप्रिल ते २० एप्रिल)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात राहू, भाग्यात गुरु, शनी केतू व प्लुटो, लाभात शुक्र, नेपचून आणि व्ययात बुध, रवी अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात सुखद असेल. रविवारी एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. त्यानंतरचे दोन दिवस  खर्चाचे असू शकतील. विद्यार्थ्यांनी या काळात अती आत्मविश्वास बाळगायला नको. यशाला परीश्रमाशिवाय पर्याय नाही याची जाणिव होईल. परदेशगमन ज्यांना करायचे आहे त्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. नोकरीबदल किंवा बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर हा काळ योग्य आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळा. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल.
उपासना: श्रीरामाची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, व्दितिय स्थानात राहू, अष्टमात गुरु, शनी, केतू  व प्लुटो, दशमात शुक्र, नेपचून, लाभात बुध, रवी आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामास प्राधान्य द्या. घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रॉपर्टीच्या कामासाठीही प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अतिशय चांगला काळ आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना कालावधी चांगला आहे. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पाठ अनुकूलता प्रदान करु शकतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, भाग्यात शुक्र, नेपचून, दशमात बुध, रवी, लाभस्थानी हर्षल आणि व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. हॉटेलिंग कराल. छान पार्टी करायला हरकत नाही. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. वरीष्ठ खुष असतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. प्रवासाचे योग संभवतात. लेखक, प्रकाशक यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर घरातील वातावरण छान राहील. प्रॉपर्टीच्या कामातून लाभ संभवतात. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्या. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे.
उपासना: सूर्याची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात गुरु, शनी केतू, व प्लुटो, अष्टमात शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात बुध, रवी, दशमात हर्षल, लाभात मंगळ, आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभही संभवतात. आपल्या कार्यक्षेत्रात छान यश मिळणार आहे. वरीष्ठ/ वडीलधारी व्यक्तींचं सहकार्य चांगलं मिळेल. सप्ताह मध्यात प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काही भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. छान पार्टीचा मूड असेल. कलाकारांना व प्रेमिकांना हा काळ चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, सप्तमात शुक्र, नेपचून, अष्टमात बुध, रवी, भाग्यात हर्षल, दशमात मंगळ आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवशी अचानक काही खर्च करावे लागतील. मनाला काही गोष्टींची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक कृत्यांसाठी अनुकूल आहेत. प्रवासयोगही संभवतात. प्रवास लाभदायक ठरु शकतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यावरसुध्दा संयम ठेवणं गरजेचे आहे. डोळ्याच्या किंवा दाताच्या काही समस्या असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना प्रतिकूल काळ आहे. सोशल मिडियावर वादग्रस्त काहीही शेअर करु नका. तुमच्यासाठी ते त्रासदायक ठरु शकेल. मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप उपयोगी ठरेल..
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, शनी, केतू, प्लुटो, षष्ठात शुक्र, नेपचून, सप्तमात बुध, रवी, अष्टमात हर्षल, भाग्यात मंगळ, आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारी मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. त्यानंतरचे दोन दिवस बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. वाहने हळू चालवा. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. जोडीदाराला एखादं मस्त गिफ़्ट देऊन त्याला खुश कराल. भागीदारीत व्यवसाय नव्याने सुरु करायचा असेल तर अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस काही भाग्यवृध्दीकारक घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवासयोग येतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. मन प्रसन्न असेल. मौज मजेकडे कल असेल.
उपासना: गुरुची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, शनी, केतू, प्लुटो, पंचमात शुक्र, नेपचून, षष्टात बुध, रवी, सप्तमात हर्षल, अष्टमात मंगळ, आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात काही बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मित्रांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. प्रेमिकांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जणवतील.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात शुक्र, नेपचून, पंचमात बुध, रवी, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमात मंगळ आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. वाद होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात आपल्या कामामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्ठांचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ संभवतो. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात शुक्र, नेपचून, चतुर्थात बुध, रवी, पंचमस्थानात हर्षल, षष्ठात मंगळ आणि सप्तमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस विचित्र घटनांचा असू शकेल. गुढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस उपासना करण्यास चांगला आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम होईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात. त्यामुळे खुश असाल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप उपयोगी ठरेल..
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, नेपचून, तृतियस्थानात बुध, रवी, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात राहू आणि व्ययस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. वाहने हळू चालवावी. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आपल्या जिवलग माणसांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, नेपचून, धनस्थानात बुध, रवी, तृतियस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात राहू, लाभस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कुठल्याही वादात पडू नका. काही आजूबाजूचे किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्‍यांनी आपल्या कामात चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: गुरुची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, रवी, धनस्थानात हर्षल, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  रवि १४ तारखेला मेष राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. शुक्र १५ तारखेला मीन राशित प्रवेश करेल. लगेच त्याचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य. सप्ताह मध्य तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: गुरुची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध