अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ एप्रिल ते १३ एप्रिल)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात राहू, भाग्यात गुरु, शनी केतू व प्लुटो, लाभात बुध, शुक्र, नेपचून आणि व्ययात रवी अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र आपल्या बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल मात्र अति खाणे टाळा. उष्णतेचे काही त्रास विशेषत: तोंड येणे यासारखे काही त्रास संभवतात. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही धनलाभ होतील. आपला एखादा स्नेही/ नातेवाईक किंवा आवडती व्यक्ती भेटल्याने मन आनंदी असेल. लेखक, ब्लॉगर्स व गायकांना हा कालावधी उत्तम आहे. मौज मजेचे प्रसंग घडतील. सप्ताहाच्या शेवटी घरात छान पार्टीचं आयोजन करायला हरकत नाही. प्रवासासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. आपल्या छंदांना जरूर वेळ द्यावा. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, व्दितिय स्थानात राहू, अष्टमात गुरु, शनी, केतू  व प्लुटो, दशमात बुध, शुक्र, नेपचून, लाभात रवी आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ आपल्या कामावर खुष असतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. मन प्रसन्न असेल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. नविन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. गायक, वक्ते, आहारतज्ञ व फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संवाद साधाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, भाग्यात बुध, शुक्र, नेपचून, दशमात रवी, लाभस्थानी हर्षल आणि व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. केलेल्या कामाचे चीज होइल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांबरोबर भेटीचे योग येतील. मात्र व्ययात असलेला लाभेश मंगळ मित्रांशी वादाचे किंवा भांडणाचे योग आणू शकेल. काळजी घ्यावी. अ‍ॅसिडीटी किंवा काही पोटाचे आजार या काळात जाणवू शकतात. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. आत्मविश्वास वाढलेला असेल. नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना चांगला काळ आहे. प्रवासाचे योग आहेत. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटीसुध्दा एखादा धनलाभ संभवतो. मन प्रसन्न असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात गुरु, शनी केतू, व प्लुटो, अष्टमात बुध, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात रवी, दशमात हर्षल, लाभात मंगळ, आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. इतिहास, मानसशास्त्र, परामानसशास्र, ज्योतिषशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करण्यास अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. मनासारखी खरेदी होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, सप्तमात बुध, शुक्र, नेपचून, अष्टमात रवी, भाग्यात हर्षल, दशमात मंगळ आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाबरोबर छान वेळ व्यतित करु शकाल. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर आता ही वेळ योग्य आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या समारंभात किंवा पार्टीत सहभागी व्हाल. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, शनी, केतू, प्लुटो, षष्ठात बुध,  शुक्र, नेपचून, सप्तमात रवी, अष्टमात हर्षल, भाग्यात मंगळ, आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मात्र अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्याऱ्यांना चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्याता आहे. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. तब्येतीचे काही त्रासही जाणवू शकतील. मात्र हा योग नोकरीबदल किंवा बदलीसाठी अनुकूलता देत आहे. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, शनी, केतू, प्लुटो, पंचमात बुध,  शुक्र, नेपचून, षष्टात रवी, सप्तमात हर्षल, अष्टमात मंगळ, आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. या काळात गैरसमज किंवा वाद झाल्यास त्याचे दूरगामी परीणाम होऊ शकतील. त्यामुळे काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात एखादा धनलाभ शक्य आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. वाहने जपून चालवा. गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. प्रवास लाभदायक व आनंदाचे ठरतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात बुध,  शुक्र, नेपचून, पंचमात रवी, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमात मंगळ आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी चांगला. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी कालावधी चांगला आहे. घरात छान पार्टीचे वातावरण असेल. जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. काहींना सूचक स्वप्न पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात बुध, शुक्र, नेपचून, चतुर्थात रवी, पंचमस्थानात हर्षल, षष्ठात मंगळ आणि सप्तमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना छान कालावधी आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल घटनांचा असू शकेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, शुक्र, नेपचून, तृतियस्थानात रवी, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात राहू  आणि व्ययस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. घरातील आवरासावर तसेच डागडुजीच्या कामासाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर वैद्यकीय व्यवसायातील लोक, केमिस्ट यांना अनुकूल ग्रहमान आहे. कोर्टकचेरीमधील कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. वादविवादात तुमचा विजय होईल. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा पगारवाढीसाठी चांगला काळ आहे. या काळात घशाच्या संसर्गापासून जपा. एकदम थंड पाणी किंवा पदार्थ टाळा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, नेपचून, धनस्थानात रवी, तृतियस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात राहू, लाभस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. सप्ताहाच्या मध्यात संततीच्य प्रगतीमूळे खुश व्हाल. मन प्रसन्न असेल. घरात छान वातावरण असेल. विवाहोच्छूक व्यकींना विवाह ठरविण्यास अनुकूल ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. नविन गुंतवणुक फ़ायदेशीर ठरेल. मात्र जोखिम टाळा. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी जास्त दगदग किंवा श्रम टाळा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, धनस्थानात हर्षल, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी बुध, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल व शुक्राची नेपचूनशी युती होईल. १२ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग, शुक्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध मीन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ नये याचीही काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. परदेशगमनासाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी मात्र प्रतिकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. एखाद्या नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध