अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ मार्च ते ९ मार्च)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात शुक्र, केतू, लाभात रवी, नेपचून आणि व्ययात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कार्यक्षेत्रात काही वादाचे प्रसंग आणू शकेल. नंतर मात्र पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना
वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभाचे प्रसंग सुखावतील तर काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकुल आहे. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांना लाभदायक काळ.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात शुक्र, केतू, दशमात रवी, नेपचून, लाभात बुध आणि व्ययस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना घटना शक्य आहेत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना चांगला काळ आहे. गूढ विषयांमधे रुची वाढेल. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रातील इतर लोक काय करतात याकडे दुर्लक्ष करा. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ चकीत करेल. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात शुक्र, केतू, भाग्यात रवी, नेपचून, दशमात बुध, आणि लाभस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. वाहने ह्ळू चालवावीत. जोडीदाराचं मन दुखावलं जाणार नाही याचीही काळजी घ्यावी. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला फ़ायदा देणारे ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी स्वत:च्या व जोडीदाराच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात शुक्र, केतू, अष्टमात रवी, नेपचून, भाग्यस्थानात बुध आणि दशमात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. मात्र जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सहजगत्या केलेल्या थट्टा मस्करीतून किंवा रागाने बोलण्यामुळे काही लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीबद्दल काही तक्रारी असतील तर दुर्लक्ष करु नका. सप्ताह मध्य विमा व्यावसायिक, मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, ज्योतिषी इ. लोकांना चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात शुक्र, केतू, सप्तमात रवी, नेपचून, अष्टमात बुध, भाग्यात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकिल तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. वाहने जपून चालवावीत. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात शुक्र, केतू, षष्ठात रवी, नेपचून, सप्तमात बुध, अष्टमात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शनी, प्लुटो, चतुर्थात शुक्र, केतू, पंचमात रवी, नेपचून, षष्टात बुध, सप्तमात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला घरात प्रसन्न वातावरण असेल. छान पार्टीचा मूड असेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भॆटी होतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काहींना चांगले लाभ होतील. एखादं छान बक्षिस, प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकेल. प्रेमिकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीबदल/ नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी अनुकूल काळ आहे. कायदेविषयक कामे करणार्‍यांसाठीही अनुकुल काळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताहातील सुरुवातीला मित्रमंडळीच्या भेटीचे योग येतील. ऒळखीच्या लोकांमुळे कामे होतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियस्थानात शुक्र, केतू, चतुर्थात रवी, नेपचून, पंचमात बुध, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे किंवा सहलीचे योग संभवतात. भावंडांची ख्याली खुशाली कळेल. साहित्तिकांसाठी व लेखकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकूल आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकुल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. कलाकारांना अनुकूल कालावधी. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी शुक्र, केतू, तृतियस्थानात रवी, नेपचून, चतुर्थात बुध, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानी राहू आणि व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. एखादा धनलाभ होऊ शकतो. मात्र आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य. मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. घरातील आवराआवरी तसेच डागडुजी या कामांसाठी सप्ताहाच्या अखेरीस वेळ काढावा लागेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, केतू, धनस्थानी रवी, नेपचून, तृतियस्थानात बुध, चतुर्थस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
एकंदरीतच सप्ताह चांगला आहे. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्याणे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. काही खर्च अचानक करावे लागू शकतात. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून काही कामे होऊ शकतात. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स, टुर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे यांना हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, नेपचून, धनस्थानात बुध, तृतियस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छानशी खरेदी कराल. एखादा अनावश्यक खर्च करावा लागेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी उत्तम काळ असणार आहे. सप्ताहाच्या मध्यात एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. जुने मित्र भेटतील. सप्ताह अखेर आपल्या कार्यक्षेत्रात छान काम झाल्याने खुशीत असाल. वरीष्ठांचही चांगलं सहकार्य मिळेल. चांगले लाभ होतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, धनस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभस्थानी शुक्र, केतू आणि व्ययस्थानी रवी, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल आणि ९ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. परदेशगमनासाठी मात्र अनुकूल कालावधी आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणाऱ्या घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. प्रवासयोग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध