अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शुक्र, शनी व प्लुटो, दशमात रवी, बुध, केतू, लाभात नेपचून व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
पूर्ण सप्ताह भाग्यकारक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ शाबासकीची एखादी थाप मिळू शकते. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह अखेरीस मनासारखी खरेदी कराल. जोडीदाराला एखादं छानसं प्रेझेंट देऊन खूश करु शकाल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शुक्र, शनी व प्लुटो, भाग्यात रवी, बुध, केतू, दशमात नेपचून, लाभात मंगळ आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. ज्योतिष, अध्यात्म अशा गूढ गोष्टींकडे ऒढा राहील. प्रवासयोग येतील. परदेशगमनासाठी प्रयत्नात असाल तर त्यासाठी अनुकूल कालावधी आहे. मात्र प्रवासात अडथळे येऊ शकतील. सप्ताह मध्यात कामात कुचराई करु नका. यशाचं प्रमाण कमी झाल्याने नाराज होऊ नका. सप्ताह अखेरीस एखदा मित्र किंवा नातेवाईक यांची भेट शक्य आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शुक्र, शनी, प्लुटो, अष्टमात रवी, बुध, केतू, भाग्यात नेपचून, दशमात मंगळ आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. विवाहोत्सुक लोकांसाठी विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. प्रवासयोग संभवतात. सप्ताह अखेरीस वरीष्ठ किंवा वडीलधारी व्यक्तींशी वाद होऊ शकतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, षष्ठात शुक्र, शनी व प्लुटो, सप्तमात रवी, बुध, केतू, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. इंशूरन्स एजंट, सर्जन यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व शिक्षणक्षेत्रातील लोकांना तसेच धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. प्रवासयोग येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शुक्र, शनी, प्लुटो, षष्ठात रवी, बुध, केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात मंगळ, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना व वकिलांना हा काळ चांगला आहे. कूठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. प्रेमी जीवांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. ज्योतिषाचा, मानसशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शुक्र, शनी, प्लुटो, पंचमात रवी, बुध, केतू, षष्ठात नेपचून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. भेळ/ पाणीपूरी असे चटकमटक पदार्थ या सप्ताहात टाळलेलेच बरे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. काहींना धनलाभ शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शुक्र, शनी, प्लुटो, चतुर्थात रवी, बुध, केतू, पंचमात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल.
३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. आप्तेष्ट/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकुल काळ आहे.  सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व नृत्यकलेशी
संबंधितांना अनुकूल आहे. सप्तहाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकिल यांना हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, तृतियस्थानात रवी, बुध, केतू, चतुर्थात नेपचून, पंचमस्थानात मंगळ आणि षष्ठस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारातून फ़टका बसण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. अ‍ॅसिडीटी/ पोटाचा काही त्रास संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, धनस्थानी रवी, बुध, केतू, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग संभवतात. छान मेजवानीचे योग येतील. काहींना प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीच्या विक्रीपासून लाभाची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, केतू, धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू,  आणि लाभस्थानी गुरु, व्ययस्थानी शुक्र, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला जरी काही अडथळे आले किंवा गोष्टी मनाविरुध्द झाल्या तरी नंतर सप्ताह चांगला आहे. डोळ्यांची या सप्ताहात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांनी भरलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठी हा कालावधी चांगला आहे. काहींना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे योग संभवतात. काही खर्च मनाविरुध्द करावे लागू शकतील. सप्ताह अखेर लेखक/ कलाकार/ कवी यांना चांगला आहे. नोकरी/ व्यवसायात छान काम होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग संभावतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शुक्र, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी रवी, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. आपल्या जिवलगांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्य भाग्यवर्धक असेल. केलेल्या कामात यशाचं मान जास्त असेल. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटी शक्य. सप्ताह अखेरीस घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा मित्रमंडळी/ आवडत्या लोकांबरोबर मस्त मेजवानीचा बेत ठेवायला हरकत नाही. घरात आनंदी वातावरण असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, लाभस्थानी रवी, बुध, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल. ७ तारखेला बुध कुंभ राशित प्रवेश करेल आणि लगेच तो मंगळाशी लाभयोग करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याची शक्यता आहे. ऒळखीच्या व्यक्तीकडून एखादं अडलेलं काम होऊ शकेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्‍यांना
चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. काहींना गुरुभेट शक्य आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध