अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० जानेवारी ते २६ जानेवारी)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाची सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, शुक्र, भाग्यात बुध, शनी व प्लुटो, दशमात रवि, केतू, लाभात नेपचून व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारी धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रवासयोग घडतील. रविवारी संध्याकाळी ६ ते सोमवार सकाळी ११ पर्यंतचा काळ मनाविरुध्द किंवा त्रासदायक घटनांचा ठरु शकेल. नंतरचा पुर्ण सप्ताह चांगला जाईल. सप्ताहाच्या मध्यात घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी कामांना प्राधान्य द्या. घरातील वातावरण छान असेल. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. सप्ताहाच्या अखेरीस नोकरीत भाग्योदय किंवा नविन नोकरीचे योग शक्य आहेत.
उपासना: गायत्री मंत्र किंवा सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, शुक्र, अष्टमात बुध, शनी व प्लुटो, भाग्यात रवि, केतू, दशमात नेपचून, लाभात मंगळ आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर घरातील वातावरण छान राहील. जुने मित्र अचानक भेटू शकतील. प्रॉपर्टीच्या कामातून लाभ संभवतात. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्या. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे.
विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे.
उपासना: ॐ गं गणपतये नम: या गणपतीच्या बीजमंत्राचा जप या सप्ताहात नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, शुक्र, सप्तमात बुध, शनी, प्लुटो, अष्टमात रवि, केतू, भाग्यात नेपचून, दशमात मंगळ आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. काही धनलाभ लांबले असतील तर ते आता मिळण्याचे योग आहेत. सप्ताह मध्यात प्रवासात काळजी घेणं गरजेचे आहे. लेखकांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद संभवतात. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकुल काळ आहे. काही दिवस थांबलेलं बरं. गूढ गोष्टींचं आकर्षण वाटेल. ज्योतिषी, ईतिहासकार यांना मात्र अनुकुल काळ आहे.
उपासना: गुरुवारी दत्तात्रयाचे दर्शन अवश्य घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, शुक्र, षष्ठात बुध, शनी व प्लुटो, सप्तमात रवि, केतू, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च करावे लागतील. धार्मिक कार्यासाठी अनुकूल काळ आहे. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. जोडीदाराचा उत्कर्ष होईल.
सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण काळ छान आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. छान प्रवासयोग येतील. भावंडे भेटतील.
उपासना: ॐ गं गणपतये नम: या गणपतीच्या बीजमंत्राचा जप या सप्ताहात नित्य करावा. कुलस्वामिनीची उपासना आवश्यक आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, शुक्र, पंचमात बुध, शनी, प्लुटो, षष्ठात रवि, केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात मंगळ, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. मित्रांकडून काही लाभ संभवतात. अडकलेली काही कामे ओळखीमुळे पटकन होऊन जातील. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्चाचे योग आहेत. हितशत्रुंच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे काळजी घ्यावी. मन शांत ठेवावे. सप्ताह मध्यानंतर एखादा विषय नव्याने शिकायला सुरुवात करण्यासाठी अनुकुल ग्रहमान आहे. आपला एखादा छंद असेल तर त्यासाठी जरुर वेळ द्या.
उपासना: ’ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ’ या मंत्राचा नित्य जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, शुक्र, चतुर्थात बुध, शनी, प्लुटो, पंचमात रवि, केतू, षष्ठात नेपचून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताहात छान ग्रहमान आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काहींना प्रवासाचे योग संभवतात. एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे किंवा जे आयात- निर्यातीचा व्यवसाय
करतात त्यांना अनुकुल ग्रहमान आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा नित्य म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शुक्र, तृतियस्थानात बुध, शनी, प्लुटो, चतुर्थात रवि, केतू, पंचमात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. वाद होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाणार आहे. सप्ताहाच्या शेवटी काही धनलाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: मारुती स्तोत्र नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र धनस्थानी बुध, शनी, प्लुटो, तृतियस्थानात रवि, केतू, चतुर्थात नेपचून, पंचमस्थानात मंगळ आणि षष्ठस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारी वाहने जपुन चालवावीत. भावंडांशी वाद होऊ देऊ नका. नंतर मात्र पुर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. धार्मिक गोष्टींसाठी कालावधी चागला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटीगाठी शक्य. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे.
उपासना: गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष या सप्ताहात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शनी, प्लुटो, धनस्थानी रवि, केतू, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी गुरु, शुक्र  अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो.
कुठलाही नविन निर्णय या कालावधीत घेऊ नका. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आप्तेष्टांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
उपासना: मारुती स्तोत्र नित्य म्हणा. मंगळवारी व शुक्रवारी मारुतीचं दर्शन अवश्य घ्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, केतू, धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू,  आणि लाभस्थानी गुरु, शुक्र व्ययस्थानी बुध, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नये. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला आहे. प्रवासयोग येतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, शुक्र, लाभस्थानी बुध, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी रवि, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद
टाळा. काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. सप्ताह अखेर शेअर्स/ कमोडीटी अशा जोखिमीच्या व्यवहारापासून लांबच रहा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, शुक्र, दशमस्थानी बुध, शनी, प्लुटो, लाभस्थानी रवि, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल. २१ तारखेला शुक्र नेपचून केंद्रयोग होईल. २२ तारखेला गुरु व शुक्राची युती होईल. २३ तारखेला बुधाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीची काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचा उत्कर्ष
होण्याची शक्यता आहे.
उपासना: महादेवाची उपासना करा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध