अ‍ॅस्ट्रोशोध मासिक राशिभविष्य- जानेवारी २०१९

आपल्या सर्वांना इंग्रजी नविन वर्षानिमित्त खुप खुप शुभेच्छा! मस्त रहा. आनंदी रहा. खुश रहा.

आता जानेवारी महिन्याच्या राशिभविष्याला सुरुवात करतो.

मेष रास-   आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. महिन्याच्या पुर्वार्धात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. संपुर्ण महिना जोखीम असलेली किंवा बेकायदा कामे टाळा. जोडीदाराशी वाद टाळा. त्यादृष्टीने दि. १३ व १४ या तारखांना जास्त जपायला हवे. धार्मिक गोष्टींसाठी दि. ५ ते ११ हा काळ चांगला आहे. १५ तारखेनंतर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम घडेल. आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ आपल्या कामावर खुष असतील.  या महिन्यासाठी उपासना: ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा.

वृषभ रास-   सप्तमात शुक्र असल्याने महिनाभर जोडिदाराबरोबर वेळ छान जाईल. जोडीदाराबद्दल काही चांगल्या बातम्या कळतील. दि. ११ ते १४ हे दिवस विशेष चांगले असतील. महिन्याच्या पुर्वार्धात विद्यार्थ्यांनी मात्र गाफ़िल राहू नये. प्रेमिकांसाठीही प्रतिकुल काळ आहे. रवि १५ तारखेपर्यंत अष्टमात असल्याने इतर सर्व क्षेत्रातही आपल्याला काळजी घ्यायला हवी. आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका. प्रॉपर्टीचे व्यवहार या काळात जपून करावेत. १५ तारखेनंतर आपली आगेकुच सुरु होणार आहे. आत्मविश्वास भरपूर असेल.   या महिन्यासाठी उपासना: महालक्ष्मीची किंवा कुलस्वामिनिची उपासना करावी.

मिथुन रास-   आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. आपण पूर्ण आत्मविश्वासाने काम कराल. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास या काळात संभवतात. त्यादृष्टीने १ ते ८ हा कालावधी व १७, १८ या तारखांना जपावे. खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घ्यावी. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर तिकडे जरुर लक्ष द्यावे. १२ ते १५ जानेवारी हा काळ अनुकुल आहे. १५ तारखेनंतर सर्वच क्षेत्रात काळजी घ्यावी. वाहने जपुन चालवा. काही मनाविरुध्द प्रसंग शक्य आहेत. संपूर्ण महिना विद्यार्थ्यांना प्रतिकुल काळ आहे. जोखिम असलेल्या ठिकाणी गुंतवणुक करु नका.  या महिन्यासाठी उपासना: गणपतीची उपासना या महिन्यात जरुर करावी.

कर्क रास-  संपूर्ण महिना विद्यार्थ्यांना व कलाकारांना खुप चांगला असणार आहे. प्रेमिकांना हा काळ काही मंतरलेले क्षण अनुभवायला देईल. त्यादृष्टीने १ ते ३ हा कालावधी महत्वाचा आहे. महिन्याच्या पुर्वार्धात आपल्या हितशत्रूंकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सायनस/ सर्दीचा त्रास आपल्याला जाणवेल. महिन्याच्या उत्तरार्धात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय असतील तर या कालावधीत भागीदाराला गृहीत धरु  १४ ते १८ जानेवारी हा काळ चांगला असणार आहे.  या महिन्यासाठी उपासना: गणपतीची उपासना या महिन्यात जरुर करावी.

सिंह रास-    महिन्याचा पुर्वार्ध उत्तरार्धापेक्षा जास्त चांगला असेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. वरीष्ठ खुष असतील. घरात आनंदी वातावरण असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. मात्र कागदपत्र नीट तपासुन घ्यावीत. आपली रसिकता वाढणार आहे. कलाकार, लेखक, साहित्यिक यांना नवनिर्मितीचा आनंद मिळेल. आपल्या छंदांना जरुर वेळ द्यावा. १५ तारखेला सुर्य षष्ठस्थानात प्रवेश करेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. संपूर्ण महिना वाहने जपुन चालवा. १ ते ६ व १७ ते २२ जानेवारी हा काळ चांगला असणार आहे. ८,९,२१,२२ या तारखा आपल्याला प्रतिकुल आहेत.  या महिन्यासाठी उपासना: महालक्ष्मीची किंवा कुलस्वामिनिची उपासना करावी.

कन्या रास- घरातील कामे, तसेच घरातील लोकांसाठी वेळ काढावा लागेल. घरात आनंदी वातावरण असेल. व्यायामाला सुरुवात करायची असेल तर ग्रहमान अनुकुल आहे. ४ ते १० जानेवारी या काळात तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नोकरीबदल किंवा वविन नोकरीच्या प्रयत्नात असाल तर महिन्याचा पुर्वार्ध अनुकुल आहे. १५ तारखेला सुर्य पंचमस्थानात प्रवेश करेल. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ असेल. संततीचे काही प्रश्न असतील तर लक्ष द्या. संपूर्ण महिना जोडीदाराशी वाद टाळावेत. ७, ८ या तारखा व २१ ते २५ जानेवारी हा काळ चांगला असणार आहे.  या महिन्यासाठी उपासना: ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा.

तुळ रास-  महिन्याच्या सुरुवातीसच आपल्या राशिचा अधिपती धनस्थानात येतोय. तो धनलाभाचे बरेच प्रसंग आणणार आहे. घरात उत्सव/ समारंभाचं वातावरण असणार आहे. मन प्रसन्न असेल. लेखक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. प्रवास लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. १५ तारखेला सुर्य चतुर्थस्थानात प्रवेश करेल. जुने मित्र भेटतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकुल कालावधी आहे. पोटाचे विकार, अ‍ॅसिडिटी यांचा त्रास कदाचित संपूर्ण महिनाभर जाणवू शकतो. १ ते ११ हा काळ चांगला असणार आहे. या महिन्यासाठी उपासना: मारुतीची उपासना करावी.

वृश्चिक रास-  महिन्याची सुरुवात छान खरेदीची. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. परदेशाशी संबंधीत काही व्यवहार असतील तर त्यातून फ़ायदा होईल. अचानक लाभाचे प्रसंग येतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. १५ तारखेला राशिबदल करुन सुर्य आपल्या तृतिय स्थानात प्रवेश करणार आहे. आपल्या पराक्रमाला नविन झळाळी येणार आहे. लाभदायक प्रवास घडतील. वरीष्ठ आपल्या कामावर खुष असतील. विद्यार्थ्यांनी मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेअर मार्केट, कमोडिटी अशा जोखिम असलेल्या ठिकाणी सध्या गुंतवणुक करु नका.    या महिन्यासाठी उपासना: गणपतीची उपासना या महिन्यात जरुर करावी.

धनु रास-  आपल्या राशित असलेला सूर्य आपला आत्मविश्वास वाढविणार आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. जुन्या मित्रांबरोबर एखादं छानसं गेट-टुगेदर करायला हरकत नाही. छान शॉपिंग कराल. सर्दी/ कफ याचा मात्र त्रास संभवतो त्याची काळजी घ्यायला हवी. १५ तारखेला सुर्य धनस्थानात प्रवेश करेल. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक गोष्टीत मन रमेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. लेखकांना अनुकुल काळ आहे. १, २ या तारखा व २५ ते २८ तारखा अनुकुल आहेत.  या महिन्यासाठी उपासना: मारुतीची उपासना करावी.

मकर रास-  महिन्याच्या पुर्वार्धात रवि आपल्या व्ययस्थानात असणार आहे. या काळात बेकायदेशीर व्यवहार कटाक्षाने टाळावेत. वाहतूकीचे नियम पाळावेत. कुणाशी वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लाभातील शुक्र आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात यश देणार आहे. वरीष्ठ खुष असतील. १५ तारखेला सुर्य आपल्याच राशित प्रवेश करेल. आपला आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कलाकारांना हा पुर्ण महिना अनुकुल असणार आहे. सर्दी/ सायनस/ मायग्रेन याचा त्रास जाणवू शकेल. दि. २७ ते ३१ हा कालावधी चांगला असेल.  या महिन्यासाठी उपासना: ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा.

कुंभ रास-  महिन्याचा पुर्वार्ध अतिशय छान आहे. प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमनही होऊ शकते. प्रेमिकांना हा कालावधी काही रोमॅंटीक अनुभव देईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ व सहकारी कामावर खुष असतील. २ ते ६ जानेवारी या तारखा खुप चांगल्या आहेत. १५ तारखेला सुर्य व्ययस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर जोडीदाराबरोबर छान खरेदी संभवते. मात्र काही कायदेशीर कटकटी या काळात उद्भवू शकतात. दि. १ ते ६ व दि. १७ ते २१ हे कालावधी अनुकुल असणार आहेत.  या महिन्यासाठी उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.

मीन रास-  सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात विरोधाचा सामना करावा लागु शकेल. हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. आणि तब्येतीचीही काळजी घ्यावी. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अचानक नोकरीचा लाभ होऊ शकेल. वकील/ कायदा क्षेत्रातील लोकांना चांगला काळ आहे. महिन्याचा उत्तरार्ध आपल्याला अनुकुल आहे. काही नविन संधी येतील. काही धनलाभ अपेक्षित आहेत. मित्रांच्या/ आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील. एखादा गॉडफ़ादर तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून तुमची कामे सहजगत्या पुर्ण होतील. दि. १ ते ६ व दि. १७ ते २१ हे कालावधी अनुकुल असणार आहेत.  या महिन्यासाठी उपासना: महालक्ष्मीची किंवा कुलस्वामिनिची उपासना करावी.

—अ‍ॅस्ट्रोशोध मासिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)