अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात रवि,
शुक्र, अष्टमात बुध, गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात केतू व लाभात मंगळ, नेपचून अशी
ग्रहस्थिती असेल.  ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि
राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही काळ
चांगला आहे. ज्योतिषी/ मानसोपचारतज्ञ यांना अनुकुल ग्रहमान आहे. अचानक लाभही
होऊ शकतात. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात
चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग शक्य आहेत. सप्ताह
अखेरीस काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात रवि , शुक्र, सप्तमात बुध,
गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात मंगळ व नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल
अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि
राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाची सुरूवात काहींना शारीरीक कुरबुरीची असू शकेल. जिवनशक्तीची कमतरता किंवा
थकवा जाणवत राहू शकेल. कुठलाही शारिरीक त्रास असल्यास अंगावर काढू नका. वैद्यकिय
सल्ला नक्की घ्या. ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा. जोडीदाराशी
किंवा मित्रांशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत,
शिक्षक यांना अनुकूल काळ. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम
झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकुल काळ
आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात रवि, शुक्र, षष्ठात बुध,
गुरु,  सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात मंगळ, नेपचून आणि लाभस्थानी हर्षल
अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि
राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराच्या तब्येतीला जपावे तसेच जोडीदाराशीव आपल्या
कार्यक्षेत्रातील वरीष्ठांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी आपले व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवासात खिसे/ पाकिट सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात रवि, शुक्र, पंचमात बुध, गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात केतू,  अष्टमात मंगळ, नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. कूठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी
गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा
करून घ्यावी. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना व डाएटीशिअन्स यांना मात्र हा काळ चांगला
आहे. सप्ताह मध्यात जोडिदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर
त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम
करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, शुक्र, चतुर्थात बुध, गुरु,  पंचमात
शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात मंगळ,  नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी
ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि राश्यांतर
करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ
मिळण्याची शक्यता आहे. संततीबाबत चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी
चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना
नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर अती
दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी
घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, शुक्र, तृतियेत बुध, गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात केतू,  षष्ठात मंगळ, नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात.
मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना अनुकुल काळ आहे. प्रवासयोग येतील.
सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नविन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्तमाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकुल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शुक्र धनस्थानी बुध, गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात मंगळ, नेपचून, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी
राहू अशी ग्रहस्थिती असेल. गुरुचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि ९ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि
राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या
सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकुल काळ आहे. भावंडांची
खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नविन प्रॉपर्टी
खरेदीसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात.
विद्यार्थ्यांना अनुकुल काळ आहे. कलाकार, खेळाडू यांनाही ग्रहमान अनुकुल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो,
तृतियेत केतू, चतुर्थात मंगळ,  नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि
व्ययस्थानी रवि, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल.
१६ नोव्हेंबरला रवि राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे योग. चांगल्या घटना घडतील. काहींना
धनलाभ होण्याची शक्यता आहे.  छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या
किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून
टाकेल. प्रवासयोग येतील. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. घराच्या डागडूजीसाठी
किंवा सजावटीसाठी काही खरेदी करावी लागू शकते.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी केतू, तृतिय स्थानात मंगळ, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी रवि, शुक्र आणि व्ययस्थानी बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. छान खरेदी होईल.
उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक
ठरेल. छान पार्टीचा मूड असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना प्रवासाचे योग संभवतात.
लेखक/ कवि यांना अनुकुल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू,  धनस्थानी मंगळ, नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  रवि, शुक्र आणि लाभस्थानी बुध,  गुरु,
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. परदेशाशी ज्यांच्या
कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक काळ आहे. प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी.
नर्तन कलेशी संबंधीत व्यक्तींसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात तब्बेत सांभाळावी.
डोळे किंवा पाय यांच्यासंबंधी काही त्रास जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह
अखेरीस खाण्यापिण्याबाबत संयम बाळगावा. पायाचे किंवा दाताचे काही त्रास असतील तर दुर्लक्ष करु नका. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  भाग्यस्थानी रवि, शुक्र,  दशमस्थानी बुध,  गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६
नोव्हेंबरला रवि राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना
घडतील. धनलाभ संभवतात. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. परदेश प्रवासासाठी
अनुकुल कालावधी आहे. नृत्यकलेशी संबंधीत लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या
शेवटी काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात.
एकंदरीत सर्वच सप्ताह चांगला व लाभदायक आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,  अष्टमस्थानी रवि,  शुक्र,  भाग्यस्थानी बुध, गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी केतू  आणि व्ययस्थानी मंगळ, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ नोव्हेंबरला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १६ नोव्हेंबरला रवि राश्यांतर करुन वृश्चिक राशित प्रवेश करेल आणि वक्री शुक्र मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून
आपल्याला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल.
काहींना प्रवास संभवतो. मित्रांच्या किंवा परीचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे
मित्रांच्या किंवा परीचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. सप्ताह
अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेश प्रवासाचे बेत मनात घोळत
रहातील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya