अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात रवि,
शुक्र, अष्टमात बुध, गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून
अशी ग्रहस्थिती असेल.  २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व
गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा
हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. सोमवार,
मंगळवार भावंडांशी/ शेजार्‍यांशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास जर करणार असाल तर
मनाविरुध्द किंवा काही त्रासदायक घटना शक्य आहेत. पुरेशी काळजी घ्यावी. हाताचे काही
दुखणे असेल (फ़्रोझन शोल्डर,..इ) काळजी घ्यावी. लेखक, वक्ते, कलाकार यांनी वादग्रस्त
गोष्टींपासून लांब राहावे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम
किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल.
कलाकारांना व प्रेमिकांना हा कालावधी खुप चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात रवि , शुक्र, सप्तमात बुध,
गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल
अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व
गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा
हर्षलशी प्रतियोग होईल.
रविवारचा दिवस तब्येतीची काळजी करायला लावणारा ठरु शकतो. कफ़, सर्दी, खोकला अशा
आजाराची शक्यता आहे. आपण होऊन कोणाशी वाद ऒढवून घेऊ नका. सोमवारनंतर मात्र
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला
असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. कलाकारांना, वक्त्यांना सप्ताह चांगला आहे. आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात रवि, शुक्र, षष्ठात बुध, गुरु,  सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनासारखी खरेदी होईल मनावर व बोलण्यावर संयम ठेवावा. थंडीपासून होणारे आजार हॊऊ शकतात. योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत घलवण्याकडे कल असेल. एखाद्या छान समारंभाचं किंवा पार्टीचं आयोजन करायला करकत नाही. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांच्यासाठी ग्रहमान चांगले आहे. संशोधक (विशेषत: शरीरशास्त्र/ औषध निर्मिती क्षेत्रात काम करणारे) यांना हा कालावधी चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात रवि, शुक्र, पंचमात बुध, गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांबरोबर गाठीभेटीचे योग शक्य आहेत. मनाला आनंद देणार्‍या
घटना घडण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास शक्य. वरीष्ठ कामावर खुष होतील.
मनासारखी चांगली खरेदी कराल. मात्र अती दगदग टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा
संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात हातातलं काम लवकर आटोपून
आराम करण्याकडे कल असेल. सप्ताह अखेरीस छान कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, शुक्र, चतुर्थात बुध, गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खूश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या
कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी
खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी
किंवा हूरहूर लागेल. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, शुक्र, तृतियेत बुध, गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग
घ्याल. काहींना वरीष्ठांकडून कौतूकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचं
कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ चांगला आहे. संततीचे काही प्रश्न असतील तर त्याकडॆ लक्ष द्यावे.
काहींना धनलाभ संभवतात. आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शुक्र धनस्थानी बुध, गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार
आहे. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्‍यांना
चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकुल
काळ. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतात. जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधीतांना अनुकुल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो,
तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि
व्ययस्थानी रवि, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. ईंन्शूरन्ससंबंधी कामे करणार्‍यांना तसेच लेखक व कवी यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांची मर्जी राखावी लागेल. कलाकारांना चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी रवि, शुक्र आणि व्ययस्थानी बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली संधी मिळू शकते.
भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला गृहीत धरु नका. जोडीदाराशी रुसवे फ़ुगवे
जाणवतील. खरेदीसाठी मात्र हा काळ चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. काही लाभ होण्याची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  रवि, शुक्र आणि लाभस्थानी बुध,  गुरु,
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
रविवारचा दिवस मजेत जाणार आहे. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त आऊटींगला जायला हरकत नाही. कलाकारांना छान कालावधी आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  भाग्यस्थानी रवि, शुक्र,  दशमस्थानी बुध,  गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकुल
काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश
मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,  अष्टमस्थानी रवि,  शुक्र,  भाग्यस्थानी बुध, गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला रविचा शनीशी लाभयोग होईल, २९ तारखेला बुध व गुरु यांची युती होणार आहे, ३१ तारखेला बुधाचा हर्षलशी षडाष्टक होईल आणि शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
रविवारी छोट्या प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. लेखकांनी वादग्रस्त
लिखाण टाळावे. सोमवार, मंगळवार काही सुखद/ आंनंददायक प्रसंग घडू शकतील. प्रॉपर्टीच्या
खरेदी विक्रीची कामे करणार्‍यांना लाभदायक काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ चांगला आहे. काही भग्यवर्धक गोष्टीही या दरम्यान शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya

Posted by | View Post | View Group