अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२१ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात रवि,
शुक्र, बुध, अष्टमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून
अशी ग्रहस्थिती असेल.  २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला
शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर
करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. काही जुन्या मित्रांच्या संपर्कात याल.
सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगला आहे. परदेशात जायचं असेल तर अनुकुल काळ
आहे. गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहू शकेल. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढविणार्‍या
घटना घडतील. कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य.
कुटुंबीयांसोबत वेळ मजेत जाणार आहे. प्रेमात पडलेल्यांना विवाह बंधनात अडकायचं
असेल तर त्यासाठी अनुकुल ग्रहमान आहे. कलाकारांना अनुकुल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात रवि , शुक्र, बुध, सप्तमात
गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला
शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर
करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह एकूणच छान जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल त्यामुळे
प्रसन्न असाल. वरीष्ठही आपल्यावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता
वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला
व्यवस्थित मिळाल्याने पार्टीचा मूड असेल. जुन्या मित्रांची भॆट शक्य आहे. सप्ताहाच्या
मध्यात मनासारखी खरेदी होईल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेरीस सर्दी/
कफ़ाचा त्रास संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात रवि, बुध, शुक्र, षष्ठात
गुरु,  सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा
शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांनी होऊ शकते. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक
कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांशी जुळवुन घ्यावे लागेल. सहकार्‍यांशी
वाद होतील असे वर्तन होऊ देऊ नका. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा कालावधी
चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. काही अपेक्षित असलेले येणे लांबू
शकते. मित्रांच्या/ आप्तांच्या विचित्र वागण्याने त्रास होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवट धनलाभाचा
ठरु शकेल. कलाकारांना छांगले ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात रवि, बुध, गुरु, शुक्र,
पंचमात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. सोमवार, मंगळवार चांगले जातील.
भाग्यवर्धक घटना शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. बढती किंवा पगार वाढीसाठीही
अनुकुल काळ आहे. विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकुल आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे.
सप्ताहाचा मध्यात व्यावसायिक कामे मार्गी लागतील. भागीदारीत व्यवसाय असेल तर विशेष
चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. धनलाभही
होण्याची शक्यता आहे.  विवाहोत्सूकांसाठी अनुकूल ग्रहयोग आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, बुध, गुरु,  शुक्र, चतुर्थात गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना
चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात तब्बेतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी काळ अनुकुल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र प्रवासात स्वत:ची व आपल्या चीजवस्तुंची काळजी घेणं गरजेचे आहे. सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, बुध, शुक्र, तृतियेत गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध
राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी व वकिलांसाठी चांगली. तब्बेतीच्या कुरबुरी जाणवत रहातील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. प्रेमिकांसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. कलाकार व खेळाडू यांना अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, शुक्र धनस्थानी गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी
राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला
शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर
करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नविन काही शिकण्यासाठी चांगला दिवस आहे.
सोमवार, मंगळवारी तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना
तसेच वकील व न्युट्रीशियन्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या जीवलगांबरोबर मजेत वेळ जाणार आहे. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी समजेल. भागीदारीत व्यवसाय करणा‍र्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा शेवटी धोका असलेली कामे करू नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानी रवि, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत
नाही. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना
अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून
टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या किरकोळ तक्रारी
जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल.

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी रवि, बुध, शुक्र आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे.
भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात नविन वास्तू खरेदी/ विक्री किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नविन विषय शिकयला किंवा एखाद्या छंदासाठी जरूर वेळ द्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  रवि, बुध,  शुक्र आणि लाभस्थानी गुरु,
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल,
२४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध
राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रवासाचे योग येतील. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य.
मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवावे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी.
सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्याने खूश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून
देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल.
सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  भाग्यस्थानी रवि, बुध,  शुक्र,  दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांबरोबर
छान सुर जमलेला असेल. धनलाभाचे योग येतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊ
शकाल. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल.
लेखकांना व वक्त्यांना काळ चांगला आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठीही अनुकुल
काळ आहे. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,  अष्टम
स्थानी रवि,  बुध, शुक्र,  भाग्यस्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा प्लुटोशी लाभयोग होईल, २४ तारखेला शुक्राचा शनीशी लाभयोग होईल, २६ तारखेला रवि शुक्र युती होईल आणि बुध राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना
फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सोमवार, मंगळवार भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. प्रवासाचे बेत
ठरतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. सप्ताह मध्य चांगला आहे.  काहींना धनलाभाचे योग
येतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर कवी, लेखक यांच्यासाठी काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. शनीवारी मात्र सोशल मिडियावर काही लिहितांना काळजी घ्यावी. वादग्रस्त विषयांपासून लांब रहा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#weeklyhoroscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya

Posted by | View Post | View Group