Weekly horoscope 29 July- 4 August

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२९ जुलै ते ४ ऑगस्ट)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात रवि, बुध, राहू, पंचमात शुक्र, सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला
मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीलाच धनलाभाचे योग संभवतात. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी कराल. आवडत्या माणसांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, बुध, राहू, चतुर्थात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात संमिश्र फ़ळे मिळतील. आपले काम चोख केल्यास व वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. मात्र तब्बेतीला जपावे. काही जुन्या व्याधी त्रास देऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना ग्रहमान अनुकूल आहे. जुन्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि , बुध, राहू, तृतिय स्थानात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ प्रतिकुल आहे. नंतरचे २ दिवस भाग्यवर्धक घटना शक्य
आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात.
सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना अनुकुल आहे. प्रेमिकानाही चांगला काळ आहे. नवीन विषयाचा
अभ्यास सुरु करण्यास ग्रहमान अनुकुल आहे. शेअर्स/ कमोडीटीशी संबंधितांना अनुकुल काळ आहे. मात्र अवाजवी जोखीम घेऊ नका. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, राहू, धनस्थानात शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल.  काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. आपली व जोडीदाराची तब्बेत सांभाळावी. सप्ताह मध्य उत्तम प्रवासाचे असतील.  काही छान, लाभदायक घटना घडू शकतात.  प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकुल ग्रहमान आहे. उपासनेसाठीही हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्यायला हरकत नाही. सप्ताहाचा शेवट नव्याने भागीदारी सुरु करायची आहे त्यांना अनुकुल आहे. अविवाहितांना विवाह ठरविण्यास काळ अनुकुल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात शुक्र, तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी रवि, बुध, राहू  अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार संध्याकाळपर्यंत तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात ज्योतिष/ ईतिहास/ सर्जन/ मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी अ‍ॅसिडीटी/ पोटाच्या तक्रारी जाणवतील. आपली मते दुसर्‍यांवर लादू नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, लाभस्थानी रवि, बुध, राहू, आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंत दिवस मजेत जाणार आहे. मौज मजा करण्याकडे कल असेल. नंतरचे २ दिवस तब्बेतीची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र हा काळ नोकरीबदलासाठी चांगला आहे. पुवी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. वकीलांना हा काळ अनुकुल आहे. फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी रवि, बुध, राहू आणि लभात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंत घरात छान वातावरण असेल. नंतरचे २ दिवस विद्यार्थ्यांना व खेळाडूंना खुप चांगले आहेत. सप्ताह मध्य वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. तब्बेतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडुन काही लाभ संभवतात. प्रेमिंकांनाही छान काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी रवि, बुध, राहू, दशमस्थानात शुक्र व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. घरात छान पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकुल कालावधी आहे. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे.नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी रवि, बुध, राहू, भाग्यस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर  काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना, कलाकारांना चांगली आहे. प्रेमिंकांनाही काळ अनुकूल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  रवि, बुध, राहू,  अष्टमस्थानात शुक्र,  दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या
मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मात्र एखादा खर्च अचानक उद्भवू शकेल. सप्ताह मध्यात काहींना जवळपासचे प्रवासयोग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, षष्ठस्थानी रवि, बुध,  राहू, सप्तमस्थानी शुक्र,  भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो
आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन
कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
आपल्यासाठी अतिशय छान सप्ताह आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल.
आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील. वडीलधारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे काही प्रलंबीत असतील तर ती मार्गी लागतील. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर प्रवासासाठीही प्रतिकुल आहे.

—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी रवि,  बुध, राहू, षष्टस्थानी शुक्र,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला शुक्र राशीबदल करुन कन्या राशीत प्रवेश करेल. २ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ छान आहे. जुन्या मित्रांच्या भेटी होऊ शकतील. काही लाभही होऊ शकतात. त्यानंतरचे २ दिवस खरेदीसाठी अनुकुल आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी योग्य काळ आहे. सप्ताह मध्य थोडासा प्रतिकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा अचानक धनलाभ संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#horoscope
#astroshodh
#astrology
#weekly
#rashi
#bhavishya