मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, हर्षल, धनस्थानी शुक्र, चतुर्थात राहू,  सप्तमात गुरु,  भाग्यात मंगळ, शनी व प्लुटो, दशमात केतू, लाभात नेपचून आणि व्ययस्थानी बुध  अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन दशमात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. काहींना जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. नित्यउपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा
ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, तृतियेत राहू, षष्ठात गुरु, अष्टमात मंगळ, शनी, व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात नेपचून, लाभात बुध आणि व्ययस्थानी रवि, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल.  २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन भाग्यात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहात सुरुवातीला पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. वैद्यकिय व्यवसाय
करणार्‍यांना व वकीलांना हा काळ चांगला आहे. नोकरीबदल किंवा नवीन नोकरीसाठी अनुकूल काळ आहे. मात्र तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराला जपा. भागीदारीत व्यवसाय असेल तर कुठल्याही प्रकारे लपवाछपवी महागात पडू शकते. सप्ताह अखेरीस पुन्हा तब्बेतीकडे लक्ष देणं भाग पडेल. मधुमेहाचा त्रास असणार्‍यांनी या काळात विशेष दक्षता घ्यावी.  —अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात गुरु, सप्तमात मंगळ,
शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात नेपचून, दशमात बुध, लाभस्थानी रवि, हर्षल आणि
व्ययस्थानी शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन अष्टमात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक
होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. तब्बेतीच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत छान जाणार आहे. अति दगदग टाळावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात मंगळ, शनी व प्लुटो, सप्तमात केतू,  अष्टमात नेपचून भाग्यात बुध, दशमात रवि, हर्षल आणि लाभात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल.  २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन सप्तमात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकुल काळ. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी थोडा प्रतिकूल आहे. शेअर्स, कमोडीटीच्या व्यवहारांमध्ये जोखिम घेऊ नका. शक्यतो या सप्ताहात त्यापासून लांब राहीलेले बरे. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील, फ़िजिकल फ़िटनेसंबंधी काम करणारे यांना अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु,  पंचमात मंगळ,  शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात बुध,  भाग्यात रवि, हर्षल दशमस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानी राहू,  अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन षष्टात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी, प्रकाशक यांना अनुकूल काळ. सप्ताह अखेरीस काहींना अचानक
धनलाभ संभवतात. विद्यार्थ्यांना अनुकुल काळ आहे. कलाकार, खेळाडूंचीही विशेष प्रगती होऊ शकते.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात मंगळ, शनी, प्लुटो, पंचमात केतू,  षष्ठात नेपचून, सप्तमात बुध, अष्टमात रवि, हर्षल, भाग्यात शुक्र  आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन पंचमात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. उद्योग व्यवसायामध्ये सुरुवातीला लागलेला चांगला सूर सप्ताहाच्या शेवटीही जाणवत राहील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत मंगळ, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात नेपचून, षष्टात बुध, सप्तमात रवि, हर्षल, अष्टमात शुक्र,  आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल.  २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन चतुर्थात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला ईतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूलता असेल. गूढ गोष्टींकडे मन ओढले जाऊ शकते. सप्ताह मध्यात घरात
छान वातावरण असेल. मात्र खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना
प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवि यांना अनुकुल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ,  शनी, प्लुटो, तृतियेत केतू,  चतुर्थात नेपचून पंचमात बुध, आणि षष्ठस्थानात रवि, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी राहू व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन तृतिय स्थानात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. आपल्या आवडीच्या व्यक्तींसाठी खास भेटवस्तू घ्यायला हरकत नाही. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी. ऊपासना करणार्‍यांना विशेष अनुकूलता आहे. सप्ताह मध्यात उगीचच कुठल्यातरी गोष्टींची चिंता वाटत राहील. ऊन्हाचा त्रास जाणवू शकतो. डोकेदुखी/ मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, शनी, प्लुटो,  धनस्थानी केतू, तृतिय स्थानात नेपचून चतुर्थात बुध, पंचमस्थानात रवि, हर्षल, षष्टस्थानात शुक्र,  अष्टमस्थानी राहू आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल.  २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन धन स्थानात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना धनलाभ संभवतात. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात काही खर्च करावे लागतील. पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतात. ज्यांच्या नोकरी/ व्यवसायाचा संबंध परदेशाशी आहे अशांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना मनासारखे लाभ होतील. काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू,  धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात बुध, चतुर्थस्थानी रवि, हर्षल, पंचमात शुक्र, सप्तमस्थानी राहू,  दशम स्थानी गुरु, आणि व्ययस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन लग्न स्थानात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने  वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरिष्ठांकडून बक्षिस/ शाबासकी मिळू शकेल. बढती किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी बुध, तृतिय स्थानात रवि, हर्षल, चतुर्थात शुक्र,  षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी मंगळ,  शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल.  २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन व्ययात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर
छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यायला अनुकूल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, धनस्थानात रवि,  हर्षल, तृतिय्स्थानी शुक्र,  पंचमस्थानी राहू,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, लाभ स्थानी केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  २९ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होईल. २ तारखेला मंगळ राशांतर करुन लाभात प्रवेश करेल आणि शुक्र व शनी यांचा षडाष्टक होईल. ५ तारखेला गुरु व बुधाचा षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला ईतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्‍यांना विशेष अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकुल काळ आहे. काहींना सुचक स्वप्ने पडू शकतात. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात कामात कुचराई होऊ देऊ नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#weekly#horoscope#astroshodh