मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल,
चतुर्थात राहू, सप्तमात गुरु, भाग्यात मंगळ, शनी व प्लुटो, दशमात
केतू , लाभात नेपचून आणि व्ययस्थानी रवि, बुध, अशी ग्रहस्थिती
असेल. ११ तारखेस शुक्राचा मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस
शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १४ तारखेस रवि लग्नस्थानात
प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांनी होऊ शकते. काहींना
प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास त्यांच्याकडून एखादी
मागणी मान्य करुन घेता येईल. एखादा सन्मान, बक्षिस किंवा
शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर
काहींना लाभ संभवतात. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीगाठीचे योग संभवतात.
सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी एखादं छानसं गिफ़्ट आणायला हरकत
नाही. किंवा मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही.
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात गुरु,
अष्टमात मंगळ, शनी, व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात नेपचून, लाभात
रवि, बुध, आणि व्ययस्थानी शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११
तारखेस शुक्राचा मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस शुक्राचा
नेपचूनशी लाभयोग होईल. १४ तारखेस रवि व्ययस्थानात प्रवेश करेल
आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी
नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मनासारखे काम झाल्याने मन
प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे.
काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठी
अनुकुल काळ. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील.
सप्ताह अखेरीस मित्रांच्या किंवा आप्तांशी वाद होणार नाहीत याची काळजी.
घ्यावी. नवीन नोकरीसाठी अनुकूल ग्रहयोग आहेत.

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात गुरु,
सप्तमात मंगळ, शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात नेपचून, दशमात रवि,
बुध आणि लाभस्थानी शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेस शुक्राचा
मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल.
१४ तारखेस रवि लाभस्थानात प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग
होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यांच्या तब्बेतीकडे
लक्ष द्यावे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनीही या कालावधीत जपून व्यवहार
करावेत. सप्ताह मध्यात तब्बेतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम
करु नये. इंशुरंस क्षेत्रात कामं करणार्‍यांसाठी काळ अनुकुल आहे. सप्ताह
मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
मात्र त्यात अडथळे येण्य़ाची शक्याता आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक
धनलाभ होऊ शकतात. तर काहींना सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा.

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु,
षष्ठात मंगळ, शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात नेपचून भाग्यात रवि,
बुध आणि दशमात शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेस शुक्राचा
मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल.
१४ तारखेस रवि दशमस्थानात प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग
होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी व
वकिलांसाठी चांगली. तब्बेतीच्या कुरबुरी जाणवत रहातील. सप्ताह मध्यात
जोडीदाराच्या तब्बेतीकडे लक्ष द्यावे. प्रेमिकांसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या
मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा व
वाहतुकीचे नियम पाळावेत. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य.
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतात.

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु, पंचमात मंगळ,
शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात रवि, बुध, भाग्यात शुक्र,
हर्षल आणि व्ययस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेस शुक्राचा
मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल.
१४ तारखेस रवि भाग्यस्थानात प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग
होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवात विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. अतिआत्मविश्वास
टाळावा. शेसर्स/ कमोडीटी सारख्या व्यवहारापसून सध्या लांब रहावे, मैदानी
खेळ खेळणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. मात्र शारीरिक दुखापती होऊ
नये याची पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना
व वकीलांना अनुकूल काळ आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न
करणार्‍यांनी तुम्हाला मिळालेली ऑफ़र पूर्ण तपासल्याशिवाय कुठलाच निर्णय
घेऊ नका. सप्ताहाचा शेवट ज्योतिषी, ईतिहासकार, मानसोपचारतज्ञ अत्यंत
चांगला आहे.

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, चतुर्थात मंगळ,
शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात नेपचून, सप्तमात रवि, बुध, अष्टमात शुक्र,
हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेस शुक्राचा मंगळाशी
त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस
शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १४ तारखेस रवि अष्टमस्थानात
प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरुवातीला घरात काही कुरबुरी/ कटकटी होण्याची
शक्यता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. सप्ताहाचा मध्य चांगला
आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करण्याची
गरज आहे. सप्ताह मध्या नंतर तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी
जोडीदाराबद्दल चांगली बातमी मिळू शकते. मन प्रसन्न असेल.

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत मंगळ,
शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात नेपचून, षष्टात रवि, बुध, सप्तमात शुक्र, हर्षल
आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेस शुक्राचा मंगळाशी
त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १४ तारखेस
रवि सप्तमस्थानात प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी
चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात नविन वास्तू
खरेदी/ विक्री किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ
आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत
चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नविन विषय शिकयला किंवा एखाद्या
छंदासाठी जरूर वेळ द्या. खेळाडूंना अनुकूल काळ आहे.

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, शनी, प्लुटो,
तृतियेत केतू, चतुर्थात नेपचून पंचमात रवि, बुध, आणि षष्ठस्थानात शुक्र, हर्षल
भाग्यस्थानी राहू, व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेस शुक्राचा
मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल.
१४ तारखेस रवि षष्टस्थानात प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग
होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रवासाचे योग येतील.
प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवावे. लेखक, वक्ते व
कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे
झाल्याने खूश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना
त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह
अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. प्रेमिकांसाठी चांगला
कालावधी आहे.

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, शनी, प्लुटो,
धनस्थानी केतू, तृतिय स्थानात नेपचून चतुर्थात रवि, बुध, पंचमस्थानात शुक्र,
हर्षल अष्टमस्थानी राहू आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ११
तारखेस शुक्राचा मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस शुक्राचा नेपचूनशी
लाभयोग होईल. १४ तारखेस रवि पंचमस्थानात प्रवेश करेल आणि मंगळाचा
नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सप्ताहाच्या
सुरूवातीला कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. एखाद्या धार्मिक
कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम
होईल. लेखकांना व वक्त्यांना काळ चांगला आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न
करणार्‍यांसाठीही अनुकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस नविन वास्तू खरेदी
किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ आहे.

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी
नेपचून, तृतियस्थानात रवि, बुध, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, सप्तमस्थानी राहू,
दशम स्थानी गुरु, आणि व्ययस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती
असेल. ११ तारखेस शुक्राचा मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस
शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १४ तारखेस रवि चतुर्थस्थानात
प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरुवात काही कटकटींनी होईल काही अनावश्यक खर्च
किंवा खरेदी होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाचा मध्य बरा आहे.
काहींच्या बाबतीत धनलाभाचे योग हातातोंडाशी आलेले लांबतील. सप्ताहाच्या
शेवटी कवी, लेखक यांच्यासाठी चांगला आहे. मन प्रसन्न असेल. कामानिमित्त
प्रवास संभवतो.

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी
रवि, बुध, तृतिय स्थानात शुक्र, हर्षल, षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु,
लाभस्थानी मंगळ, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल.
११ तारखेस शुक्राचा मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस
शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १४ तारखेस रवि तृतियस्थानात
प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांबरोबर गाठीभेटीचे योग येतील. पूर्वी
केलेल्या गुंतवणूकीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या
कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांनाही अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यातही काही
लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना
प्रवासयोग येतील. धार्मिक गोष्टींसाठीही हा काळ अनुकूल आहे.

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, धनस्थानात
शुक्र, हर्षल, पंचमस्थानी राहू, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी मंगळ, शनी,
प्लुटो, लाभ स्थानी केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.
११ तारखेस शुक्राचा मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस
शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १४ तारखेस रवि धनस्थानात
प्रवेश करेल आणि मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल.
फ़लादेश: संपूर्ण सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी
मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील
लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील.
सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे
लागू शकतात. बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक
गॊष्टींमध्ये मन रमेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)