चंद्रग्रहण वेगळ्या दृष्टीक्षेपातून-
दि. ३१ जाने. २०१८ रोजी खग्रास चंद्रग्रहण होत आहे. ग्रहणाचा कालावधी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते रात्री ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण कोणाला कसं असणार आहे हे आपण वेगळ्या दृष्टीकोनातून बघूया.
आकाशात एकाच वेळी सूर्य आणि चंद्र पूर्ण तेजाने झळकू शकत नाहीत. जेव्हा सूर्य आकाशात दिसत असतो तेव्हा चंद्र आकाशात दिसलाच तरी तेव्हा तो खूपच क्षीणबली असतो.
आपल्या पत्रिकेमध्येही सूर्य किंवा चंद्र यापैकी एकच जास्त बलवान असतो. सूर्यावरून आत्मिक
शक्ती तर चंद्रावरुन मन किंवा मनाची शक्ती विचारात घेतली जाते. पत्रिकेच्या थोड्याशा अभ्यासाने कुणालाही तुमच्या पत्रिकेत सूर्य आणि चंद्र यापैकी कोण बलवान आहे हे कळू शकते. न कळल्यास एखादया ज्योतिषाच्या मदतीने तुम्ही ते सहज माहीत करुन घेऊ शकतात.
अगदीच ढोबळ मानाने बघायचे झाल्यास जे स्वप्नाळू आहेत, ज्यांचं मन चंचल आहे, जे भित्र्या
स्वभावाचे आहेत त्यांचा चंद्र जास्त बलवान आहे असे समजायला हरकत नाही. त्यांना आपण
चंद्रप्रधान व्यक्ती म्हणू. याच्या उलट जे लोक दृढनिश्चयी स्वभावाचे आहेत, तेजस्वी आहेत, ज्यांचं मन स्थीर आहे अशा सर्व लोकांचा सूर्य जास्त बलवान असतो. त्यांना आपण सूर्यप्रधान व्यक्ती म्हणू.
जेव्हा चंद्रग्रहण होतं तेव्हा ज्योतिषीय दृष्ट्या चंद्राची फ़ल देण्याची ताकद कमी झाली असते. अशा वेळी चंद्रप्रधान व्यक्तींना हा कालावधी त्रासदायक ठरू शकतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सूर्यप्रधान व्यक्तींना मात्र हा कालावधी चांगला तसेच आत्मविश्वास वाढविणारा ठरु शकतो.
ज्यांना मन जिंकायचं आहे किंवा मनावर ताबा मिळवायचा आहे त्यांनी या काळात ध्यानधारणा, मेडीडेशन, जपजाप्य जरुर करावे. चंचलता निर्माण करणार्‍या चंद्राची ज्योतिषीय दृष्ट्या ताकद या काळात नैसर्गीकरीत्याच कमी असल्याने ध्यानधारणा,  मेडीडेशन, जपजाप्य केल्यास आत्मिक शक्ती वाढण्यास जरुर मदत होईल.
ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी चंद्रग्रहण अवश्य बघावे.
………….अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी ९४२२०८८९७९)

 

#Astroshodh#chandragrahan#Jyotish#Meditation#